कोल्हापूर : पावसाळ्यात बिंदू चौकापासून लक्ष्मीपुरीपर्यंत रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी चॅनेलच्या माध्यमातून वळविण्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची सुरुवात सोमवारी झाली. सुमारे चाळीस लाखांचे काम असून, त्यातील पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले होते. आता दुसऱ्या टप्प्यातील हे काम वीस लाखांचे आहे. काम पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मीपुरीतील सांडपाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
मंगळवार पेठ, बाराइमाम, अंबाबाई मंदिर परिसर, पापाची तिकटी परिसरातून येणारे सांडपाणी, पावसाचे पाणी हे बिंदू चौक येथून बागवान गल्ली, महात गल्ली, भोई गल्ली मार्गे लक्ष्मीपुरी चौकात जमा होऊन नवीन चॅनेलमधून लक्ष्मीपुरी रिलायन्स मॉल ते जयंती नाला येथे या पाण्याचा निचरा होणार आहे. पावसाळ्यात हेच सांडपाणी बिंदू चौकात ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावरून वाहत नागरिकांच्या घरांत शिरत होेते.
माजी महापौर निलोफर आजरेकर यांनी महानगरपालिका फंडातून चाळीस लाखांचा निधी मंजूर करून घेतला होता. त्यापैकी यापूर्वी २० लाखांचे काम झाले आहे. उर्वरित २० लाखांचे काम सोमवारी सामाजिक कार्यकर्ते जयेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निलोफर आजरेकर, आश्कीन आजरेकर, गणी आजरेकर, सदानंद दिगे, शौकत बागवान, समीर बागवान, विनोद शिंदे, दस्तगीर बागवान, मोहसीन बागवान, अशपाक शिकलगार, राजू जमादार, शकील कोतवाल उपस्थित होते.