कोल्हापूर : करवीर तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबे, व्यावसायिक कारागीर, पडझड झालेल्या घरांचे, गोठ्यांचे तसेच वाहून गेलेल्या पशुधनाचे व कृषी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. तरी पूरबाधितांनी आवश्यक कागदपत्रे देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांनी शनिवारी केले.
पुरामुळे बाधित झालेल्या करवीर तालुक्यातील छोटे गॅरेज, उद्योग व्यावसायिक, हस्तकला, हातमाग कारागीर, बारा बलुतेदार, दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारक, इतर पडझड झालेल्या घरांचे, गोठ्यांचे तसेच मयत व वाहून गेलेल्या पशुधनाचे व कृषी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पथकांकडून केले जात आहेत.
या पथकाला आवश्यक ती कागदपत्रे दिल्यास पंचनामे वेळेत पूर्ण होऊन शासनाकडून दिली जाणारी मदत व अनुदान लवकरात लवकर मिळेल. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.ही कागदपत्रे तयार ठेवा- रेशन कार्ड, बँक पासबुक, आधार कार्ड झेरॉक्स, घरठाण पत्रक, ७/१२ उतारा, प्रॉपर्टी कार्ड.पंचनाम्यासाठी येथे संपर्क साधा१ ) सानुग्रह, निर्वाह भत्त्याचे अनुदान, घराची, गोठ्याची पडझड, व्यावसायिक - शहर : कोल्हापूर मनपा, करवीर : कसबा बावडा, जाधववाडी : उचगाव तलाठी कार्यालय.ग्रामीण भागात : गावचे तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, घर/ गोठा पडझडीसाठी बांधकाम विभाग पंचायत समिती करवीर,२) कृषी- शहर : तालुका कृषी अधिकारी कार्यालय, करवीर तसेच करवीर, कसबा बावडा, जाधववाडी उंचगाव कृषी सहायक व तलाठी कार्यालय.ग्रामीण भागात- तालुका कृषी अधिकारी कार्यालय करवीर तसेच संबंधित गावचे कृषी सहायक कार्यालय व तलाठी कार्यालय३) पशुधन- शहरी भाग व ग्रामीण भाग : पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती करवीर, गावचे तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय.