शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

विनापरवानगी मिरवणुका : कोल्हापुरातील तीन मंडळांवर गुन्हे दाखल

By उद्धव गोडसे | Published: October 28, 2023 1:14 PM

कोल्हापूर : दुर्गा मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विनापरवानगी मिरवणुका काढून वाहतुकीला अडथळा केल्याबद्दल, तसेच आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल लक्ष्मीपुरी पोलिसांनी ...

कोल्हापूर : दुर्गा मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विनापरवानगी मिरवणुका काढून वाहतुकीला अडथळा केल्याबद्दल, तसेच आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल लक्ष्मीपुरी पोलिसांनी तीन मंडळांवर गुन्हे दाखल केले. यात रंकाळा स्टँड परिसरातील श्री महादेव तरुण मंडळ, लक्षतीर्थ वसाहत येथील शिवतेज तालीम मंडळ आणि सोमवार पेठेतील शिवभक्त बॉईज मंडळाच्या १८ कार्यकर्त्यांसह तीन ध्वनी यंत्रणा मालकांचा समावेश आहे.गणेशोत्सवात विना परवानगी मिरवणुका काढून आवाज मर्यादेचे उल्लंघन केलेल्या मंडळांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर, आता नवरात्रोत्सवातही पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन केलेली मंडळे रडारवर आली आहेत. महादेव तरुण मंडळ, शिवतेज तालीम मंडळ आणि शिवभक्त बॉईज मंडळाने बुधवारी (दि. २५) रात्री शहरातील प्रमुख मार्गांवर विना परवानगी विसर्जन मिरवणूक काढली. मोठ्या आकाराचे स्ट्रक्चर उभे करून वाहतुकीला अडथळा केला. आवाज मर्यादेचे उल्लंघन करून नागरिकांना त्रास होईल असे वर्तन केले. याबद्दल पोलिसांनी तिन्ही मंडळांचे कार्यकर्ते आणि ध्वनी यंत्रणा मालकांवर गुन्हे दाखल केले.यांच्यावर झाली कारवाईरंकाळा स्टँड येथील श्री महादेव तरुण मंडळाचे अध्यक्ष शुभम किरण बामणे, उपाध्यक्ष निरंजन सुधीर आयरेकर, सचिव तन्मय मोहन सावेकर, उपसचिव मारुफ गुलामबक्ष मुजावर, सदस्य सत्यजीत शिवराज सूर्यवंशी (सर्व रा. रंकाळा रोड, कोल्हापूर) आणि ध्वनी यंत्रणा मालक दिग्विजय संभाजी चव्हाण (रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) यांच्यावर गुन्हा दाखल केला.लक्षतीर्थ वसाहत येथील शिवतेज तालीम मंडळाचे अध्यक्ष अवधूत धर्मेंद्र तिवारे, उपाध्यक्ष राहुल बाळासो धुमाळ, सदस्य शरद सदाशिव पाटील, विशाल उत्तम कांबळे, शोएब सिकंदर गोलंदाज, सागर गजानन भोसले, आदित्य निवास साळुंखे (सर्व रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर), ध्वनी यंत्रणेचे मालक सौरभ पंडित संकपाळ (रा. साकोली कॉर्नर, कोल्हापूर) आणि सोमवार पेठेतील शिवभक्त बॉईज मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश उमेश चव्हाण, उपाध्यक्ष सौरभ पोवार, सचिव अवधूत शिंदे, सदस्य ऋषिकेश पोवार, आर्यन पोवार, तुषार पोवार (सर्व रा. सोमवार पेठ, कोल्हापूर) ध्वनी यंत्रणा मालक सिद्धार्थ गोविंद मोरे (रा. सरवडे, ता. राधानगरी) यांच्यावर गुन्हे दाखल झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस