कोल्हापूर : नाचणीचे काड, डोंगरी गवत व कधीतरी गाजर गवतावर हरियाणा येथील ‘मुऱ्हा’ जातीच्या म्हशींचे उत्कृष्ट संगोपन बेरकळवाडीच्या (ता. करवीर) दूध उत्पादकांनी केले आहे. छोट्याशा वाडीत तब्बल ४७ मुऱ्हा म्हशी व ३९ मुऱ्हा जातीच्या रेड्या आहेत. त्याच्या माध्यमातून रोज ५७० लिटर दूध संकलन करत खऱ्या अर्थाने सातेरीच्या डोंगरकपारीत बेरकळवाडीतील शेतकऱ्यांनी ‘गोकुळ’ फुलवला आहे.कोल्हापूर शहरापासून २३ किलोमीटर नयनरम्य ‘सातेरी’ डोंगराच्या कुशीत बेरकळवाडी वसली आहे. पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असल्याने येथे वीट व्यवसाय व शेतीच होते. स्थानिक जातीच्या जनावरांचे संगोपन करायचे, त्यातून संकलन होणारे ५० लिटर दूध प्रतिदिन ‘गोकुळ’ला पाठवले जाते.मात्र ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या पाठबळावर संजय खोंद्रे यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन जुलै २०१६ मध्ये हरियाणा येथून मुऱ्हा जातीच्या म्हशी खरेदी केल्या. आज बेरकळवाडीत ४७ मुऱ्हा म्हशी, ३९ मुऱ्हा रेड्या आहेत.कावळ्याच्या डोळ्यासारखे शुद्ध पाणी
डोंगरझऱ्यातून येत असलेले पाणी कावळ्याच्या डोळ्यासारखे शुद्ध आहे. हवा, पाण्यासह एकूणच अल्हाददायक वातावरण जनावरांच्या वाढीस पोषक ठरत आहे.घोड्यावरून दूध वाहतूक करणारे गाववाहतुकीची व्यवस्था नसल्याने बेरकळवाडीतून घोड्यावरून दूध वाहतूक करून चाफोडीत जाऊन ते घातले जायचे. हे काम एकटे घोडेच करायचे, दूध उत्पादकांची होणारी परवड ओळखून ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी अंतर्गत वाहतूक सुरू केली.
धस्टपुष्ट म्हशी
उत्पादकाने मनात आणले तर जनावरांचे संगोपन कसे करता येते, हे बेरकळवाडीकरांनी दाखवून दिले आहे. म्हशी इतक्या धस्टपुस्ट आहे, त्यांच्या पाठीवर माणूसही सहज झोपू शकेल.कष्ट, जिद्दीचे अध्यक्षांकडून कौतुक
- तीन-चार वर्षांपूर्वी लाखाची म्हैस खरेदी करण्याचे धाडस शेतकऱ्यांनी दाखवले. काहीतरी वेगळे करण्याची जिगर दाखवली.- आणखी २५ म्हशी आणणार असून, गायीचे दूध उत्पादन बंद करून वर्षात माणसी दोन लिटर दूध उत्पादनाचा संकल्प शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे कष्ट, जिद्दीबद्दल अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह संचालकांनी त्यांचे कौतुक केले.
दृष्टिक्षेपात बेरकळवाडी-कुटुंबे - १३०लाेकसंख्या - ७५०क्षेत्र - १५० एकरभात क्षेत्र - ४५ एकरडोंगर - १०५ एकरमुऱ्हा म्हशी - ८६दूध - ५७० लिटर प्रतिदिन