शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
4
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
5
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
6
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
7
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
8
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
9
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
10
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
11
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
12
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
13
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
14
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
15
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
16
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
17
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती
18
प्रचारासाठी मिळणार अवघे १४ दिवस; मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह उमेदवारांची धावपळ
19
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

राज्यात ४१ लाख टन साखरेचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 11:29 PM

चंद्रकांत कित्तुरे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चालू गळीत हंगामात डिसेंबरअखेर राज्यात ३९८ लाख ७७ हजार टन उसाचे ...

चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : चालू गळीत हंगामात डिसेंबरअखेर राज्यात ३९८ लाख ७७ हजार टन उसाचे गाळप झाले असून ४१ लाख १६ हजार ४८ टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळपात पुणे विभाग तर उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे.राज्यात २० आॅक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू झाला असला तरी दिवाळीनंतरच त्याने गती घेतली. राज्यातील सहकारी ९९ आणि खासगी ८६ अशा १८५ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता ७ लाख ६६८० टन इतकी आहे. राज्यातील ७ विभागांपैकी पुणे विभागात सर्वाधिक ६२ कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांनी १६९ लाख २५ हजार क्विंटल उसाचे गाळप करून १७ लाख ३८८ हजार टन साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा साखर उतारा १०.२७ टक्के आहे. त्याखालोखाल कोल्हापूर विभागात ३६ कारखाने सुरू असून त्यांनी ८३ लाख ४० हजार टन उसाचे गाळप करुन ९ लाख ५८१ टन साखरेचे उत्पादन केले आहे. कोल्हापूर विभागाचा साखर उतारा ११.४९ टक्के इतका तर राज्याचा साखर उतारा १०.४४ टक्के इतका आहे. २८ डिसेंबरअखेरचे हे आकडे आहेत.राज्यात या हंगामात १०७.२३ लाख टन साखर उत्पादन होईल, असा सुरुवातीला अंदाज होता. मात्र, दुष्काळ आणि हुमणीचा प्रार्दुभाव यामुळे उत्पादनात घट येऊन ९५ लाख टनांपर्यंत साखर उत्पादन होईल, असा सुधारित अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.कोल्हापूर विभागात ऊस बिलांचा तिढागाळप हंगाम सुरू होऊन दोन महिने होत आले तरी कोल्हापूर विभागात शेतकºयांच्या हाती अद्याप ऊस बिले पडलेली नाहीत. एफआरपी एकरकमी देण्याला कारखान्यांनी असमर्थता व्यक्त करून सरकारकडे मदतीसाठी साकडे घातले आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपीच मिळावी यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.यासंदर्भात कोल्हापुरातील साखर कारखानदारांची ५ जानेवारीला बैठक होणार असून त्यात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात अन्यत्र मात्र एफआरपीचे तुकडे पाडून काही कारखान्यांनी ८० -२० किंवा ८० -३० अशा स्वरुपात ऊस बिले देणे सुरू केले आहे.विभागनिहाय ऊस गाळप आणि साखर उत्पादनविभाग कारखाने ऊस गाळप साखर उत्पादन उतारा (%)कोल्हापूर ३६ ८३.४० ९५.८१ ११.४९पुणे ६२ १६९.२३ १७३.८८ १०.२७अहमदनगर २८ ६१.७ ६३.०१ १०.३२औरंगाबाद २२ ३४.८३ ३३.३७ ९.५८नांदेड ३२ ४७.६५ ४८.०२ १०.०८अमरावती २ १.०४ १.०५ १०.१०नागपूर ३ १.५४ १.३४ ०८.७३एकूण १८५ ३९८.७७ ४१६.४८ १०.४४(ऊस गाळप लाख मे. टन तर साखर उत्पादन लाख क्विंटलमध्ये )