(फोटो)
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाईल केमिस्ट्रीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘डेव्हलपमेंट ऑफ निडबेस्ड इन्सर्टस फॉर फेसमास्क’ या विषयावर संशोधन केले. त्यांनी औषधी गुणधर्म असलेले इन्सर्टस विकसित केले आहेत.
कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून प्रतिबंधक उपाय म्हणून करणसिंह पाटील, अक्षय कुलकर्णी, हरीशराज के व सद्दाम सुतार या विद्यार्थ्यांनी हा नावीन्यपूर्ण प्रकल्प हाती घेतला. त्यांनी मास्कमध्ये वापरता येणाऱ्या या औषधी गुणधर्म असलेल्या इन्सर्टसची निर्मिती केली. व्हिस्कोस नॉनवोव्हन कापडावर एन्कॅप्युलेशन पद्धतीने निलगिरी व जास्मिन तेलाचा वापर करून हे इन्सर्टस बनविले आहे. याचा वापर सर्दी, दम्यासारख्या आजारांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी तसेच कोरोनासारख्या विषाणूपासून संरक्षणासाठी करता येऊ शकतो. विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले व प्रा. डॉ. यू जे. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
(फोटो ओळी)
१६१२२०२०-आयसीएच-०२
इचलकरंजीतील ‘डीकेटीई’मधील विद्यार्थ्यांनी बनविले औषधी गुणधर्म असलेले इन्सर्टस.