शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

संस्था विलीनीकरण केले तरच व्यावसायिकता शक्य

By admin | Published: January 04, 2017 12:27 AM

एका गावात एकच सक्षम संस्था गरजेची : सरकारने केवळ आवाहन न करता मदत करावी

राजाराम लोंढे - कोल्हापूर --राजकीय गणितांसाठी एका-एका गावात तीन-चार विकास संस्था असल्याने त्यातील एकही धड नाही. विकास संस्थांनी व्यावसायिकतेकडे जायचे झाल्यास पहिल्यांदा या संस्थांचे विलीनीकरण करून एका गावात एकच संस्था होणे गरजेचे आहे. विकास संस्थांची आर्थिक स्थिती व व्यवसायासाठी लागणारे अपेक्षित भांडवल पाहता सरकारने केवळ आवाहन करून चालणार नाही, भांडवलासाठी प्रोत्साहनपर मदत करावी, अशी मागणी पुढे येत आहे.विकास संस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, हे मान्य असले तरी येथे राजकीय अड्डे झाल्याने हा कणा मोडकळीस आला आहे. दोन हजार लोकसंख्येच्या गावात दोन-तीन विकास संस्था असल्याने सर्वच संस्था आर्थिकदृष्ट्या अकार्यक्षम बनल्या आहेत. व्यवसायाभिमुख बनल्याशिवाय संस्था सक्षम होणार नाहीत, त्यात कोणाचेच दुमत नाही; पण गावपातळीवर आता असा कोणता व्यवसाय राहिला की जो संस्थांनी सुरू करावा आणि त्यातून चार पैसे उत्पन्न मिळावे. स्वस्त धान्य दुकान सरकारने बचतगटांना चालविण्यास दिले आहेत. दळप-कांडप व्यवसाय गल्लोगल्ली आहेत. कापड दुकाने तर ठेचाला झाल्याने संस्थांनी नेमका व्यवसाय काय करावा, याबाबत संस्था पातळीवरच संभ्रम आहे. धाडसाने एखादा व्यवसाय सुरू केला तर त्यासाठी भांडवल कसे उपलब्ध करायचे? व्यावसायिक स्पर्धेत टिकायचे झाल्यास खासगी व्यावसायिकांचे मोठे आव्हान संस्थांसमोर राहणार आहे. ज्या संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, ते या स्पर्धेत टिकूही शकतील; पण कमकुवत संस्था पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता अधिक आहे. विकास संस्था सक्षम करायच्या झाल्यास पहिल्यांदा गल्लोगल्ली झालेल्या संस्थांचे विलीनीकरण करून एकच सक्षम संस्था कार्यरत झाली पाहिजे. त्यासाठी राजकीय मानसिकताही तितकीच महत्त्वाची आहे. सरकारने आता नवीन विकास संस्थांना परवानगी देताना पाच लाख भागभांडवल, किमान पाचशे सभासद व एक वर्षाच्या आत व्यवसाय सुरू करणे बंधनकारक केले आहे. नोंदणी झाल्यानंतर संस्थांनी हे निकष पाळले नाहीत, तर सहकार विभाग संस्थेची कधीही नोंदणी रद्द करू शकते, असे नवीन धोरण सहकार खात्याच्या विचाराधीन आहे. (उत्तरार्थ) कऱ्हाडच्या संघाचा आदर्शकऱ्हाड खरेदी-विक्री संघाने हंगामी व्यवसाय सुरू केले आहेत. येथे फटाके विक्रीपासून शेती अवजारांची विक्री केली जाते. आपल्याकडे श्रीराम विकास संस्था, कसबा बावड्याच्या पेट्रोलपंपासह विविध विभाग कार्यरत आहेत. काही सक्षम संस्थांना हा प्रयोग पेलेलही; पण सरसकट सर्वांनी व्यवसाय करणे अशक्य आहे. विकास संस्थांची आर्थिक स्थिती पाहता सगळ्यांकडूनच हा प्रयोग यशस्वी होणार नाही; पण सक्षम संस्थांनी खत विक्रीत न अडकता इतर व्यवसायांत उतरले पाहिजे. - मोेहन सालपे,माजी अध्यक्ष, श्रीराम विकास संस्था, कसबा बावडा