शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

वेतनासाठी कृषि महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांकडून कामबंद

By admin | Published: March 15, 2017 4:16 PM

ठिय्या आंदोलन; सहाय्यक नियंत्रकांवर कारवाईची मागणी

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपासून थकीत असलेले वेतन त्वरीत अदा करावे. वेतन थकविण्यासाठी जबाबदार असलेल्या सहाय्यक नियंत्रकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी कृषि महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी बुधवारी कामबंद आंदोलन केले. त्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या मारत निदर्शने केली.येथील कृषि महाविद्यालयात ३५ प्राध्यापक, तर १९० शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे जानेवारी आणि फेब्रुवारीचे वेतन अदा झालेले नाही. महाविद्यालयातील सहाय्यक नियंत्रक यांनी संबंधित वेतन अदा करण्याबाबत कोणतीही ठोस व सकारात्मक कार्यवाही केली नाही. वेतन थकीत असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना उदरनिर्वाह करणे, कर्जाचे हप्ते भरणे अडचणीचे ठरले आहे. शिवाय काहींना कर्जाच्या व्याजाचा दंड नाहकपणे भरावा लागत आहे. सहाय्यक नियंत्रकांकडून झालेली नसलेल्या कार्यवाही आणि त्यामुळे वेतन थकीत राहिल्याने अखेर महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आक्रमक झाले. त्यांनी काल, मंगळवारी सायंकाळी महाविद्यालयाच्या कुलसचिवांना घेराओ घातला. शिवाय थकीत वेतन बारा तासात अदा न झाल्यास कामबंदचा इशारा दिला. यावेळी प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी वेतन त्वरीत अदा करावे. सहाय्यक नियंत्रकांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देखील दिले. यानंतर वेतन अदा झाले नाही. त्यामुळे संबंधित प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या मारला आणि कामबंद केले. या आंदोलनामुळे महाविद्यालयातील प्रशासकीय, शैक्षणिक काम ठप्प झाले. (प्रतिनिधी)विद्यापीठाच्या आदेशानुसार कार्यवाहीमहाविद्यालयात मंगळवारी व बुधवारी झालेल्या आंदोलनाची आणि या आंदोलनकर्त्या प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागणींबाबतचा अहवाल राहुरी कृषी विद्यापीठाला सादर केला असल्याचे सहायोगी अधिष्ठाता डॉ. जी. जी. खोत यांनी सांगितले. ते म्हणाले, तांत्रिक अडचणीमुळे वेतन अदा होवू शकले नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.