शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

पुरोगामी विचारांचा जागर पुन्हा उभारी घेऊ शकतो : बाबा आढाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:04 AM

आजरा : फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. आजच्या अंधारमय काळात प्रकाशाची ज्योत पेटत आहे.

ठळक मुद्देबेळगाव येथे राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार प्रदानपैशाला हात लावायला सरकारला कोणी रोखलं आहे काय?

आजरा : फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. आजच्या अंधारमय काळात प्रकाशाची ज्योत पेटत आहे. त्यामुळे पुरोगाम्यांनी खचून न जाता नव्या पिढीमध्ये विचारांची पेरणी केल्यास पुरोगामी विचारांचा जागर पुन्हा उभारी घेऊ शकतो, असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केला.

बेळगाव येथील ज्योती महाविद्यालयात बाबा आढाव यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कम्युनिष्ट नेते कॉ. कृष्णा मेणसे यांच्या हस्ते राष्ट्रवीरकार गुरुवर्य शामराव देसाई पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आढाव म्हणाले, समाजातील मोठा वर्ग आजही अंधश्रद्धेत हरवला आहे. अंधश्रद्धा दूर करायची असेल तर विज्ञानवादी संस्कारक्षम पिढी निर्माण होण्याची गरज आहे. जोपर्यंत तरुण पिढीशी संवाद होत नाही. तोपर्यंत विचारांचा आबोला राहणार आहे. सत्यशोधक चळवळ अनेकांनी पुढे नेली ती आताच का थबकली याचा विचार करण्याची गरज आहे.

नोटाबंदीसारख्या निर्णयामुळे कष्टकरांची उपासमार झाली. आज देशातील ५० कोटी जनता असुरक्षित, अस्वस्थ आणि असंघटित आहे. असे असताना देशातील मंदिरातील सोने, पैशाला हात लावायला सरकारला कोणी रोखलं आहे काय? असा सवाल करून हमीभावाचा मूळ प्रश्न सोडविला जात नाही तोपर्यंत आत्महत्या होणारच असल्याचे सांगितले.

यावेळी डॉ. मंजुश्री पवार म्हणाल्या, राष्ट्रवीरकार देसाई यांनी निर्भिड पत्रकारिता केली. राष्ट्रवीरकारांनी अज्ञान, अंधश्रद्धेवर, धार्मिक गुलामगिरीविरुद्ध लेखणी व कृतीतून घणाघात केला. त्यांचे अप्रकाशित असलेले लेख ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार संपादित करणार आहेत. यावेळी प्राचार्य आनंद मेणसे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, प्रकाश मरगाळे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिप्पूरकर, शिवाजी देसाई, प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, कॉ. संपत देसाई, प्रा. डॉ. प्रकाश पवार, एम. डी. कांबळे यांसह बेळगाव, आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. राजाभाऊ पाटील यांनी स्वागत केले. प्रा. मायाप्पा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विक्रम पाटील यांनी आभार मानले.बेळगावात लक्ष्मी यात्रा बंदसत्यशोधक चळवळ मोठ्या प्रमाणात रुजविलेल्या बेळगावमध्ये १९३६ पासून लक्ष्मी यात्रा होत नाही. यात्रा, मंदिरापेक्षा शिक्षणावर खर्च झाला पाहिजे, असेही मेणसे यांनी यावेळी सांगितले.‘शाहू महाराजांची माया वेगळी’

आढाव यांनी शाहू महाराजांच्या निधनानंतर महाराजांसोबत असणाºया वृद्ध धनगराला आपण भेटल्याचे सांगितले. त्यावेळी धनगराला राजा गेल्यामुळे आता तुम्हीच राजे झाला असा मिश्किलपणे सवाल केला. त्यावर तो धनगर म्हणाला, ‘आम्ही राजे झालो खरं, पण शाहू राजांची माया आगळीच होती’, असे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.