शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

प्रांतांच्या निषेधार्थ गडहिंग्लज कडकडीत बंद

By admin | Published: January 02, 2015 11:35 PM

बेकायदेशीर वहिवाट : नागरिकांची एकजूट; मोर्चा काढून दिले मागणीचे निवेदन

गडहिंग्लज : ५४ वर्षांपूर्वी प्रांतकचेरी सुरू करण्यासाठी नगरपालिकेकडून भाड्याने घेतलेली धर्मशाळा इमारत व जागेस बेकायदेशीररीत्या वहिवाटदार म्हणून परस्पर उपविभागीय अधिकारी यांचे नाव लावल्याबद्दल कडकडीत बंद पाळून गडहिंग्लजकरांनी प्रांताधिकाऱ्यांचा निषेध केला. मोर्चाने जाऊन प्रांताधिकारी व भूमिअभिलेख उपअधीक्षक यांना निवेदन दिले.लक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. नेहरू चौक, शिवाजी चौक, बाजारपेठ, वीरशैव बँक, मेनरोड, कांबळे तिकटी, अहिल्याबाई होळकर चौक, दसरा चौक या मार्गावर फिरून मोर्चा प्रांतकचेरीवर आला. याठिकणी सभा झाली.मोर्चात आमदार हसन मुश्रीफ, नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी, राष्ट्रवादीचे गटनेते रामदास कुराडे, माजी नगराध्यक्ष बापू म्हेत्री, अकबर मुल्ला, दत्ता बरगे, राजन पेडणेकर व निरुपमा बन्ने, मजूर फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष उदय जोशी, लायन्स क्लबचे अध्यक्ष आर. के. वांद्रे, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप माने, मनसे तालुकाध्यक्ष नागेश चौगुले, वीरशैव समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष राजशेखर दड्डी व उपाध्यक्ष बसवराज जमदाडे, ‘स्वाभिमानीचे’ अशोक पाटील, किसान सभेचे तालुकाध्यक्ष अमरनाथ घुगरी, बड्याचीवाडीच्या सरपंच गीता देसाई, गडहिंग्लज शहर किराणा भुसार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुनील तेली, शिक्षण मंडळ सभापती सुरेश कोळकी, भारतीय जैन संघटनेचे सुरेंद्र साळवी व महावीर दसूरकर, प्राचार्य जे. बी. बार्देस्कर, सतीश पाटील, प्रा. रमेश पाटील, सुनील चौगुले, बाळासाहेब घुगरे, हातगाडी खोकीधारक संघटनेचे अध्यक्ष दादू पाटील, गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष तानाजी मोहिते, काँगे्रसचे शहराध्यक्ष बसवराज आजरी, शिवाजीराव खोत, ‘दानिविप’चे संस्थापक रमजान अत्तार, प्राचार्य जे. बी. बारदेसकर, विक्रांत पावले, आदी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषणा देऊन परिसर चांगलाच दणाणून सोडला होता. (प्रतिनिधी)लक्ष्यवेधी घोषणा, जेसीबी व बंदोबस्ताची चर्चामनसे तालुकाध्यक्ष नागेश चौगुले यांनी मोर्चाच्यावेळी प्रांतकचेरीच्या दारात जेसीबी आणला होता. लक्ष्यवेधी घोषणा, जेसीबी बंदोबस्ताची दिवसभर शहरात चर्चा होती.भूमिअभिलेख धारेवरभूमिअभिलेख कार्यालयावर निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर मोजणी व फेरफाराची नोटीस नगरपालिकेला का दिली नाही? असा जाब विचारून माजी नगराध्य्...अन् निवेदन स्वीकारलेमोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारायला पहिल्यांदा तहसीलदार हनुमंत पाटील आले. मात्र, प्रांतकचेरीवर मोर्चा असल्यामुळे प्रांतांनीच निवेदन स्वीकारावे, असा आग्रह झाला. त्यावेळी प्रांतांसमोर कोर्ट केसीस सुरू असल्याचा निरोप आला. आक्रमक आंदोलकांनी रास्ता रोकोचा इशारा दिला. त्यामुळे सहायक जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी स्वत: गेटवर येऊन निवेदन स्वीकारले.‘लोकमत’च्या बातम्यांची चर्चा‘लोकमत’ने प्रांतकचेरीच्या जागेला वहिवाटदार म्हणून नाव लावण्याच्या हालचालीपासूनच्या सर्व घडामोडींबाबत सडेतोड बातम्यांद्वारे प्रकाशझोत टाकला. याप्रश्नी सुरू केलेल्या ‘प्रांतकचेरीची कूळकथा’ या मालिकेचे झेरॉक्स मोर्चादरम्यान शहरात वाटण्यात आले. ाक्ष अकबर मुल्ला यांनी शिरस्तेदार समीर खडकवाले यांना धारेवर धरले.