शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

वकिलांनी विजय मनुगडेवर शाई मारुन केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 6:57 PM

कोल्हापूर : राजेंद्रनगर परिसरातील एका शाळेमधील मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी हॉकीचा प्रशिक्षक संशयित विजय मनुगडे याच्यावर मंगळवारी न्यायसंकुलच्या आवारात वकीलांनी शाई मारुन निषेध केला. यावेळी वकिलांनी मनुगडेला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी केली.गेल्या आठवड्यात शाळेतील मुलींवर अत्याचार प्रकरणी संशयित विजय मनुगडे (वय ३६,रा.देवकर पाणंद) याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. ...

ठळक मुद्देशाळेतील मुलींवर अत्याचार प्रकरण कोल्हापूर न्यायसंकुल आवारातील प्रकारमनुगडेला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी

कोल्हापूर : राजेंद्रनगर परिसरातील एका शाळेमधील मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी हॉकीचा प्रशिक्षक संशयित विजय मनुगडे याच्यावर मंगळवारी न्यायसंकुलच्या आवारात वकीलांनी शाई मारुन निषेध केला. यावेळी वकिलांनी मनुगडेला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी केली.गेल्या आठवड्यात शाळेतील मुलींवर अत्याचार प्रकरणी संशयित विजय मनुगडे (वय ३६,रा.देवकर पाणंद) याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. मंगळवारी दूपारी त्याला पोलिस न्यायालयात आणत असताना न्यायसंकुल इमारतीच्या पाठिमागे वकील गेले. त्यावेळी मनुगडेला पोलिस न्यायालयात बंदोबस्तात नेत असताना त्याला संतप्त वकीलांनी त्याच्या अंगावर शाई मारुन त्याचा निषेध केला. त्यानंतर त्याला पोलिसांनी न्यायालयात नेले.यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस म्हणाले, हा प्रकार शिक्षिकी पेशाला काळीमा फासणारा आहे. त्याचे हे कृत्य घृणास्पद आहे. त्यामुळे न्यायालयाने त्याला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी.अ‍ॅड. मीना पोवार म्हणाल्या, हा प्रकार म्हणजे समस्त महिला वर्गांचा अपमान आहे. त्याला शिक्षा व्हावी. यामध्ये जिल्हा बार असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष अ‍ॅड. नारायण भांदिगरे, माजी अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. प्रकाश मोरे यांच्यासह अ‍ॅड. राजेंद्र मंडलिक, अ‍ॅड. अरुण पाटील, अ‍ॅड. दीपक पाटील, अ‍ॅड. अतुल जाधव, अ‍ॅड. पंडितराव मरळकर, अ‍ॅड. विजय महाजन ,अ‍ॅड. शिवराम जोशी आदींचा सहभाग होता.