शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

समीर गायकवाडवरील आरोपनिश्चिती लांबणीवर

By admin | Published: October 25, 2016 11:57 PM

पानसरे हत्या प्रकरण : तावडेच्या कोठडीच्या निर्णयावर आज सुनावणी

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील संशयित समीर गायकवाड याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यासंबंधी मंगळवारी सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर सुनावणी होती. उच्च न्यायालयाने दोषारोप दाखल करण्यासाठी २७ आॅक्टोबरपर्यंत स्थगिती दिल्याने ही सुनावणी ५ नोव्हेंबरला होईल, असे न्यायाधीश बिले यांनी स्पष्ट केले. आज, बुधवारी दुसरा संशयित आरोपी वीरेंद्र तावडे याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपत आहे. त्यावर सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. पानसरे हत्याप्रकरणी संशयित समीर गायकवाड याच्याविरोधात ‘एसआयटी’ने दोषारोप न्यायालयात दाखल केले आहे. दोषारोपपत्र दाखल करण्यास उच्च न्यायालयाने उद्या, गुरुवारपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे मंगळवारी गायकवाडच्या आरोपनिश्चितीवरील सुनावणी न्यायाधीश बिले यांनी पुढे ढकलली. उद्या उच्च न्यायालयात आरोपनिश्चितीवरील स्थगिती निर्णयावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याच खटल्यातील दुसरा संशयित आरोपी वीरेंद्र तावडे सध्या येरवडा कारागृहात आहे. त्याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज, बुधवारी संपत आहे. या सुनावणीसह आरोपीचे वकील समीर पटवर्धन व वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पोलिसांविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. त्याच्या अंतिम निकालाची सुनावणी सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या दालनात होत आहे. सुनावणीस अ‍ॅड. चंद्रकांत बुधले, अ‍ॅड. समीर पटवर्धन, अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, पोलिस निरीक्षक अमृत देशमुख, आदी उपस्थित होते. कारागृहात त्रास नाहीआरोपनिश्चितीच्या सुनावणीला समीर न्यायालयात हजर होता. मागील सुनावणीला त्याने तुरुंगाधिकारी चंद्रकांत आवळे यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार केली होती. तिची गांभीर्याने दखल घेत न्यायाधीश बिले यांनी कारागृह प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. यासंबंधी काही त्रास आहे का, अशी विचारणा न्यायाधीश बिले यांनी समीरला केली असता, त्याने सध्या कारागृहात कोणत्याही प्रकारे त्रास नसल्याचे सांगितले.