संतोष मिठारी - कोल्हापूर--चर्चासत्र, परिषद, कार्यशाळा, अभ्यासक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचा शिवाजी विद्यापीठातील गांधी अभ्यास केंद्राकडून प्रचार व प्रसार केला जातो. आता पुढचे पाऊल म्हणून परीक्षांद्वारे गांधीविचारांच्या प्रसाराचा उपक्रम केंद्र राबविणार आहे. शिवाय राज्यातील गांधीविचारांनी कार्यरत संस्थांशी सामंजस्य करार करून उपक्रमांची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) ‘युगप्रवर्तक नेते’ योजनेंतर्गत विद्यापीठाला गांधी अभ्यासकेंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली. गांधीविचारांचा प्रसार, प्रचार आणि याबाबतचे संशोधन करणे असा उद्देश असलेल्या या केंद्राचे उद्घाटन २ आॅक्टोबर २००० रोजी गांधीवादी विचारवंत श्रीकांत आपटे यांच्या हस्ते झाले. स्थापनेपासून ‘यूजीसी’कडून या केंद्राला दरवर्षी ७ लाख ५० हजारांचा निधी मिळत होता. गेल्या वर्षीपासून तो बंद झाला. त्यामुळे विद्यापीठाच्या निधीतून या केंद्राचे कामकाज चालते. गेल्या १५ वर्षांच्या वाटचालीत केंद्राने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्रे आदींच्या माध्यमातून देशात शिवाजी विद्यापीठ व कोल्हापूरची वेगळी ओळख निर्माण केली. शालेय विद्यार्थी, तुरुंगांतील बंदीजन, आदींमध्ये गांधीविचार रुजविण्यासाठी परीक्षेचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याद्वारे समाजातील घटकांपर्यंत गांधीविचार पोहोचविले जाणार आहेत. शिवाय कोथरूड (पुणे)मधील महात्मा गांधी स्मारक केंद्र आणि जळगावच्या महात्मा गांधी फौंडेशनशी सामंजस्य करार करून उपक्रमांची व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र पाऊल टाकणार आहे.सध्या केंद्राद्वारे गांधीजींसह उत्तर गांधीवादी नेते विनोबा भावे, काका कालेलकर, जयप्रकाश नारायण, प्रेमा कंटक, आदींबाबतचे संशोधन झाले आहे. त्यानुषंगाने पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यापुढील टप्पा म्हणून समाजातील विविध घटकांपर्यंत गांधीविचार पोहोचविण्यासाठी परीक्षा घेण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यापीठाकडून दरवर्षी तीन लाख रुपयांचा निधी केंद्राला मिळतो. पण केंद्राचे कार्य, उपक्रमांची व्याप्ती वाढविण्यासाठी निधीचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून लोकवर्गणीद्वारे निधी संकलित केला जाईल. - प्रा.डॉ. भारती पाटील, समन्वयक, गांधी अभ्यास केंद्र, शिवाजी विद्यापीठ, गांधीजींचे आत्मचरित्र आणि त्यांच्या जीवनावरील अन्य काही छोटी-छोटी पुस्तके परीक्षा घेण्यापूर्वी शालेय विद्यार्थी, तुरुंगातील बंदीजन, आदींना वाचण्यास दिली जातील. त्यावर एक तासाची परीक्षा घेण्यात येईल. त्याची सुरुवात जूनपासून करण्यात येणार आहे.सध्या केंद्राद्वारे गांधीजींसह उत्तर गांधीवादी नेते विनोबा भावे, काका कालेलकर, जयप्रकाश नारायण, प्रेमा कंटक, आदींबाबतचे संशोधन झाले आहे. त्यानुषंगाने पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यापुढील टप्पा म्हणून समाजातील विविध घटकांपर्यंत गांधीविचार पोहोचविण्यासाठी परीक्षा घेण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यापीठाकडून दरवर्षी तीन लाख रुपयांचा निधी केंद्राला मिळतो. पण केंद्राचे कार्य, उपक्रमांची व्याप्ती वाढविण्यासाठी निधीचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून लोकवर्गणीद्वारे निधी संकलित केला जाईल. - प्रा.डॉ. भारती पाटील, समन्वयक, गांधी अभ्यास केंद्र, शिवाजी विद्यापीठ,
गांधी विचारांचा प्रसार परीक्षांद्वारे
By admin | Published: October 01, 2015 11:29 PM