कोल्हापूर : जिल्ह्यात महसूल विभागातील २३ कर्मचाऱ्यांची पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे. यात वाहनचालक ते लिपिक, लिपिक ते अव्वल कारकून, शिपाई ते लिपिक, तलाठी ते मंडल अधिकारी अशा विविध पदोन्नतीचा समावेश आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी या पदोन्नतीचे आदेश काढले.
जिल्ह्यातील उपविभागीय आस्थापनेतील तलाठी संवर्गातील गीता कुंभार (गडहिंग्लज) यांची आजरा, संभाजी गाडीवड्ड (भुदरगड) यांची गडहिंग्लज, शरद मगदुम (गडहिंग्लज) यांची कोवाड, मुरलीधर पाटुकले (हातकणंगले) यांची इचलकरंजी, जयवंत पोवार (करवीर) यांची पुरवठा अव्वल कारकून, संजय सुतार (राधानगरी) यांची जयसिंगपूर, संतोष पाटील (करवीर) यांची अव्वल कारकून भूसंपादन अधिकारी या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय चतुर्थश्रेणी संवर्गातील शिपाई ते लिपिक पदावर ३ जणांची लिपिक ते अव्वल कारकूनपदी १० कर्मचाऱ्यांना व वाहनचालक ते लिपिक यावर दोन कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
--