पदवीधर अंशकालीन उमेदवारांना विशष बाब म्हणून कंत्राटी तत्त्वावर नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला; परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. त्याबाबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. राज्यातील सर्वच विभागांनी शासनाच्या नियमास अधीन राहून पदवीधर अंशकालीन उमेदवारांकरिता रिक्त असणारी सर्व पदे तातडीने भरावीत. याबाबत ज्या जिल्ह्यामध्ये कार्यवाही होत नसल्यास यासाठी राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील रिक्त पदांचा आढावा घेण्याकरिता संबंधित जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून आढावा घेण्याची सूचना मंत्री नवाब मलिक यांनी केली. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव अन्शु सिन्हा, आयुक्त दीपेंद्रसिंह खुशवा, अवर सचिव संतोष रोकडे, सहसंचालक विनय राऊत, रेखा आहेरराव, बाबासो जठार, एकनाथ मोरे, मिलिंद भोले, अब्दुल हमीद, पद्मा चिंतले, सुरुखा गुरव, आदी उपस्थित होते.
पदवीधर अंशकालीन उमेदवारांच्या कंत्राटी तत्त्वावरील नियुक्त्या तातडीने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:20 AM