राम मगदूम - गडहिंग्लज -‘जीव आणि मालमत्ता वाचविणे’ हेच अग्निशमन दलाचे ‘ब्रीद’ आहे. गडहिंग्लज परिसरात गेल्या पाच वर्षांत लागलेल्या आगीच्या एकूण १९१ घटनांमध्ये नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तब्बल दोन कोटी २३ लाख १९ हजारांची मालमत्ता सुरक्षितरीत्या वाचवून ‘ब्रीद’ सार्थ ठरविले.२०१० ते २०१४ दरम्यानच्या घटनेत ८९ गवतगंज्या, २९ खोपी/घरे, ३५ उसाचे फड, तीन दुकाने/ गोडाऊन, दोन बगॅस डेपो व पाच वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. एका ठिकाणी गॅस सिलिंडरचा स्फोट, तर एका बँकेच्या एटीएम मशिनला आग लागली. आगीची सूचना मिळताच जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी या पथकाने प्राणाची बाजी लावली.१९७९ पासून नगरपालिकेतर्फे अग्निशमन सेवा सुरू झाली. गडहिंग्लज शहराच्या हद्दीत ही सेवा मोफत, तर गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल व भुदरगडसह सीमाभागात संकटकालीन सेवा नाममात्र इंधन खर्चाच्या मोबदल्यात पुरविली जाते.शासनाच्या आकृतिबंधानुसार आवश्यक अग्निशमन पर्यवेक्षकासह काही जागा रिक्त असल्यामुळे काही कर्मचारी ठेका पद्धतीवर घेण्यात आले आहेत. प्रशिक्षित व पुरेसे कर्मचारी आणि आवश्यक अत्याधुनिक साधने नसतानाही या विभागाने ही मोलाची कामगिरी बजावली आहे.फायरमन महादेव बारामती व भैरू कारंडे, फायरकुली दत्ता मुन्ने, चालक रमेश गायकवाड, दत्तात्रय शिसाळ व गजानन कुंभार, बाबासाहेब बिलावर, रवींद्र मेंडुले, जहीर पटेल, नेताजी गवळी, सागर गवळी, सूरज सावेकर, सागर कांबळे, दत्तात्रय पोटजाळे, अजित कांबळे, दत्ता गाडीवडर, आदींनी ही सेवा बजावली. वर्ष घटना जिवितहानी वित्तहानी वाचविलेली मालमत्ता२०१० १४ २ जनावरे, २ माणसे १२ लाख ३१ हजार३० लाख ८० हजार२०११३२-------२७ लाख ७९ हजार५९ लाख२०१२८६२ जनावरे५० लाख ६३ हजार९५ लाख ५९ हजार२०१३२४१ माणूस१४ लाख १५ हजार२४ लाख२०१४३५-------१३ लाख ६५ हजार२३ लाख ८० हजारएकूण१९१४ जनावरे, ३ माणसे१,१८,५३,०००२,२३,१९,०००या ठळक घटनेत बजावली कामगिरी८ मार्च २०१२ - हेमरस कारखान्याच्या बगॅस डेपोला आग.२१ मार्च २०१२ - मंडलिक कारखान्याच्या बगॅस डेपोला आग.२३ जून २०१३ - हरळी येथे संतप्त जमावाने एस.टी. पेटवली.२७ जुलै २०१४ - बँक आॅफ बडोदाच्या एटीएम मशीनला आग.
पाच वर्षांत वाचवली सव्वादोन कोटींची मालमत्ता
By admin | Published: January 29, 2015 12:30 AM