कोल्हापूर : आपल्या न्याय्य मागण्यांसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणाऱ्या धरणग्रस्तांची जिल्हा पुनर्वसन अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी आज, बुधवारी पुन्हा एकदा बोळवण केली. मोघम आश्वासने देत सूर्यवंशी यांनी ठिय्या आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र, धरणग्रस्तांनी ते साफ धुडकावले.स्पष्ट निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचा निर्धार धरणग्रस्तांनी केला आहे. दरम्यान, धरणग्रस्तांच्या मागणीप्रमाणे पुनर्वसनाच्या प्रक्रियेतील सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक सोमवारी (दि. २९) दुपारी ३.३० वाजता घेण्यात येणार असल्याचे सूर्यवंशी यांनी कळविले आहे. पुनर्वसन अधिकाऱ्यांनी काल, मंगळवारी रात्री उशिरा धरणग्रस्तांना दिलेल्या पत्रात प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईची माहिती दिली.दरम्यान, आंदोलकांनी यावर जोरदार आक्षेप घेतला. ज्या धरणग्रस्तांना जिल्हाधिकाऱ्यांनी भूखंड व जमीन वाटपाचे आदेश दिले आहेत, तरीही अशांची पुन्हा सुनावणी घेऊन त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. हा सर्व प्रकार म्हणजे पुनर्वसनाचा बेकायदेशीर व चुकीचा पायंडा आहे, असे कॉ. अशोक जाधव यांनी म्हटले आहे.विद्यार्थ्यांचा सहभाग येथील सायबर कॉलेजमधील एमएसडब्ल्यूच्या प्रथम व द्वितीय वर्षात शिकणाऱ्या एकूण ३७ विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आज धरणग्रस्तांच्या आंदोलनास पाठिंबा देऊन आंदोलनात एक दिवस भागीदारी केली. विद्यार्थ्यांनी धरणग्रस्तांचे प्रश्न समजावून घेतले. विशाल पोळ, मेघा शिंदे, अशोक तलवार, अफजल शिरोळकर, स्वाती फोंडके, अमोल कांबळे, कृतिका यादव, शिवानंद वांडरे,रूपाली कोरडे, आदींनी त्याचे नेतृत्व केले.विद्यार्थ्यांचा सहभाग येथील सायबर कॉलेजमधील एमएसडब्ल्यूच्या प्रथम व द्वितीय वर्षात शिकणाऱ्या एकूण ३७ विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आज धरणग्रस्तांच्या आंदोलनास पाठिंबा देऊन आंदोलनात एक दिवस भागीदारी केली. विद्यार्थ्यांनी धरणग्रस्तांचे प्रश्न समजावून घेतले. विशाल पोळ, मेघा शिंदे, अशोक तलवार, अफजल शिरोळकर, स्वाती फोंडके, अमोल कांबळे, कृतिका यादव, शिवानंद वांडरे,रूपाली कोरडे, आदींनी त्याचे नेतृत्व केले.
अधिकाऱ्यांकडून धरणग्रस्तांची बोळवण
By admin | Published: December 24, 2014 10:42 PM