कोल्हापूर : पोलिस कर्मचाऱ्यांच्या असलेल्या वसाहतीच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव द्या, राज्य सरकारकडे निधीसाठी पाठपुरावा करू, अशी सूचना राज्याचे गृह विभागाचे अपर सचिव के.पी. बक्षी यांनी केली. बक्षी हे गुरुवार (दि. २८)पासून कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात शुक्रवारी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सीसीटीव्ही कंट्रोल रूमची पाहणी केली. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. ही बैठक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडी-अडचणीसंदर्भात चर्चेसाठी बोलविण्यात आली होती.तत्पूर्वी, के. पी. बक्षी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर जुना बुधवार पेठ, लक्ष्मीपुरी व मुख्यालयातील पोलिस वसाहतींची पाहणी करून निवासस्थानाला भेट दिली. पोलिस कर्मचाऱ्यांच्या मूलभूत सुविधांबाबत कुटुंबीयांबरोबर चर्चा केली. यावेळी बक्षी यांनी, प्रत्येक अधिकाऱ्याने गुन्हा सिद्धतेचे प्रमाण कसे वाढेल यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच जास्तीत जास्त गुन्हेगारांवरील दोष सिद्ध करा, त्याचबरोबर महानगरपालिकेची सर्व प्रकारची पोलिस प्रशासनाची थकीत बिले आहेत, ती त्वरित देण्यात येतील, असे सांगितले. ते म्हणाले, पोलिस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या दुरवस्था झाल्या आहेत त्यादेखील नूतनीकरण कराव्या लागणार आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव द्यावा, त्यासाठी राज्य सरकारकडून निधीसाठी प्रयत्न केले जातील. प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याविषयी बोलू, असे बक्षी यांनी सांगितले. बैठकीनंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कंट्रोल रूमची पाहणी करून ते मुंबईकडे रवाना झाले.बैठकीस अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, चैतन्या एस., शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, अमरसिंह जाधव, डॉ. सागर पाटील, रमेश सरवदे यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘लोकमत’च्या वृत्ताची दखल‘लोकमत’च्या बुधवार (दि. २७) च्या अंकात पोलिस वसाहतीबाबत ‘घरांची पडझड, पोलिसांची धडपड’ या आशयाची बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेऊन शुक्रवारी राज्याचे गृहविभागाचे अप्पर सचिव के.पी. बक्षी यांनी जुना बुधवार पेठ, लक्ष्मीपुरी व पोलिस मुख्यालयातील पोलिस वसाहतींची प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली. त्याच्यासमवेत जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.गृहविभागाचे अपर सचिव के.पी. बक्षी यांनी कोल्हापुरातील पोलिस वसाहतीची पाहणी करून पोलिसांच्या निवासस्थानांना भेटी दिल्या. यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे उपस्थित होते.
वसाहतीच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव द्या-‘लोकमत’च्या वृत्ताची दखल
By admin | Published: April 29, 2016 11:55 PM