यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील म्हणाले, ज्या नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले, त्याच नारायण राणे यांनी शिवसेना पक्षात राहून पक्ष गिळण्याचा प्रयत्न केला. गद्दारी केली. त्यामुळे बाळासाहेबांनी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली. त्यानंतर काँग्रेस, स्वाभिमानी पक्षात रमून झाल्यावर आता राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने राणे यांना मंत्रिपद महाराष्ट्रात गोंधळ घालण्यासाठी दिले आहे.
यावेळी बोलताना अर्जुन आबिटकर म्हणाले, गेल्या चार दिवसांपासून भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नावाखाली नारायण राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे राज्यातील शिवसैनिक संतापले आहेत. नारायण राणे यांच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन सुरू आहे.
यावेळी माजी उपसभापती सुनील निंबाळकर, मौनी विद्यापीठाचे संचालक बाजीराव चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, माजी उपसरपंच अरुण शिंदे, ग्रामपंचायत सदस्य रणधीर शिंदे, संग्रामसिंह सावंत, महादेव पाटील, तानाजी देसाई, अशोक दाभोळे, राजू चिले, अजित चौगले, नेताजी सारंग, भरत शेटके, प्रशांत भोई, पांडुरंग कांबळे, विद्याधर परीट यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ
नारायण राणे यांच्या विरोधात आंदोलन करताना प्रकाश पाटील, अर्जुन आबिटकर, अविनाश शिंदे, विद्याधर परीट आदी.