शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: युगेंद्र पवारांसाठी शरद पवार मैदानात, बारामतीमध्ये भेटी-गाठी वाढवल्या; माळेगाव कारखान्याच्या माजी अध्यक्षांची घेतली भेट
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं योग्यवेळी उत्तर देऊ'; रोहित पाटलांचा रोख कुणाकडे?
3
विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल
4
शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी...
5
साऊथच्या सुपरस्टारला ओळखलं का? 'या' चित्रपटात साकारणार हनुमानाची भूमिका
6
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
7
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
8
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
9
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
10
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
11
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
12
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
13
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
15
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
16
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
17
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
18
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
19
मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
20
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!

मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी दुबईतील मराठा रहिवाशांचे धरणे

By संदीप आडनाईक | Published: December 23, 2023 7:16 PM

कोल्हापूर : मराठा आरक्षणाला तसेच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुपच्या पुढाकाराने दुबईत शनिवारी मराठा ...

कोल्हापूर : मराठा आरक्षणाला तसेच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुपच्या पुढाकाराने दुबईत शनिवारी मराठा समाजातील रहिवाशांनी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून दुबईतील जबील पार्क येथे परवानगी घेउन शनिवारी सकाळी १० वाजता छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुपच्या पुढाकाराने धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये दुबईतील मराठा बांधवही सहभागी झाले. कोल्हापूरातील राजीव लिंग्रज वैयक्तिक कामासाठी दुबईत आहेत. त्यांनी प्रथम जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधून या आंदोलनाची कल्पना दिली. त्यानंतर दुबईतील मराठा बांधवांनी हे आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, मराठा आरक्षणाचे टी शर्ट, भगवा झेंडा, फलक घेउन हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दुबई येथील रघुनाथ सगळे, अभिजित देशमुख, संदीप कड, अमोल डुबे पाटील, विक्रम भोसले, श्रेयस पाटील, मुकूंद पाटील, अनिल थोपटे पाटील, दीपाली डाके सहभागी झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण