दसरा चौकात सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सकाळी निदर्शने करण्यात आली. त्यामध्ये राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. मराठा समाजाने ४५ वर्षे केलेला संघर्ष राज्य सरकारने धुळीला मिळविला आहे. त्यामुळे आता ‘सियासत अगर जंग चाहती हे तो जंग ही सही’ या भूमिकेत मराठा समाज राहणार आहे. त्याची सुरुवात कोल्हापूरमधून होईल, असे समन्वयक सचिन तोडकर आणि दिलीप पाटील यांनी सांगितले. यावेळी स्वप्नील पार्टे, रुपेश पाटील, भास्कर पाटील, रवी जाधव, सामर्जीत तोडकर, शैलेश जाधव, उमेश साळोखे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी चौकात सकल मराठा शौर्यपीठाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही बुधवारी दुपारी शांततेने ठिय्या आंदोलन करून आरक्षण रद्दबाबत निषेध नोंदविला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी योग्य भूमिका जर या सरकारने घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शौर्यपीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद जाधव यांनी दिला. यावेळी प्रकाश सरनाईक, महादेव आयरेकर, मनोहर सोरप, विक्रम पवार, राजेंद्र थोरावडे, नंदकुमार घोरपडे आदी उपस्थित होते. नर्सरी बाग येथील राजर्षी शाहू समाधी स्थळ येथे सायंकाळी सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी आत्मक्लेश केला. आरक्षण रद्द झाल्याबाबतची खंत आम्ही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष प्रारंभाच्या पूर्वसंध्येला या आत्मक्लेशद्वारे व्यक्त केली असल्याची माहिती इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी दिली. यावेळी वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, गुलाबराव घोरपडे, हर्षेल सुर्वे, संजय काटकर, रवी पाटील आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
नोकरी, शिक्षणात टिकायचे असेल, तर आरक्षणाशिवाय मराठ्यांना पर्याय नाही. गायकवाड आयोगाच्या शिफारशी मान्य करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा महाराष्ट्रामध्ये नव्या क्रांतीला सुरुवात होईल.
प्रा. मधुकर पाटील, अधिसभा सदस्य, शिवाजी विद्यापीठ.
आरक्षण रद्द निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास काढून घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला शासन जबाबदार आहे. विद्यार्थी मित्रांना एकच विनंती आहे. कोणीही कुठलेही चुकीचे पाऊल उचलू नये.
-प्रतीकसिंह काटकर, शहराध्यक्ष, मराठा महासंघ विद्यार्थी संघटना.
फोटो (०५०५२०२१-कोल-मराठा समाज आत्मक्लेश ०१, ०२) : कोल्हापुरात बुधवारी राजर्षी शाहू समाधीस्थळ येथे सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी आरक्षण रद्दबाबत आत्मक्लेश केला. (छाया : आदित्य वेल्हाळ).
फोटो (०५०५२०२१-कोल-मराठा शौर्यपीठ) : कोल्हापुरात बुधवारी छत्रपती शिवाजी चौक येथे सकल मराठा शौर्यपीठाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
फोटो (०५०५२०२१-कोल-मराठा ठोक मोर्चा): कोल्हापुरात बुधवारी दसरा चौक येथे सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)
===Photopath===
050521\05kol_2_05052021_5.jpg~050521\05kol_3_05052021_5.jpg~050521\05kol_4_05052021_5.jpg
===Caption===
फोटो (०५०५२०२१-कोल-मराठा समाज आत्मक्लेश ०१, ०२) : कोल्हापुरात बुधवारी राजर्षी शाहू समाधीस्थळ येथे सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी आरक्षण रद्दबाबत आत्मक्लेश केला. (छाया : आदित्य वेल्हाळ).फोटो (०५०५२०२१-कोल-मराठा शौर्यपीठ) : कोल्हापुरात बुधवारी छत्रपती शिवाजी चौक येथे सकल मराठा शौर्यपीठाच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.फोटो (०५०५२०२१-कोल-मराठा ठोक मोर्चा): कोल्हापुरात बुधवारी दसरा चौक येथे सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)~फोटो (०५०५२०२१-कोल-मराठा समाज आत्मक्लेश ०१, ०२) : कोल्हापुरात बुधवारी राजर्षी शाहू समाधीस्थळ येथे सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी आरक्षण रद्दबाबत आत्मक्लेश केला. (छाया : आदित्य वेल्हाळ).फोटो (०५०५२०२१-कोल-मराठा शौर्यपीठ) : कोल्हापुरात बुधवारी छत्रपती शिवाजी चौक येथे सकल मराठा शौर्यपीठाच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.फोटो (०५०५२०२१-कोल-मराठा ठोक मोर्चा): कोल्हापुरात बुधवारी दसरा चौक येथे सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)~फोटो (०५०५२०२१-कोल-मराठा समाज आत्मक्लेश ०१, ०२) : कोल्हापुरात बुधवारी राजर्षी शाहू समाधीस्थळ येथे सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी आरक्षण रद्दबाबत आत्मक्लेश केला. (छाया : आदित्य वेल्हाळ).फोटो (०५०५२०२१-कोल-मराठा शौर्यपीठ) : कोल्हापुरात बुधवारी छत्रपती शिवाजी चौक येथे सकल मराठा शौर्यपीठाच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.फोटो (०५०५२०२१-कोल-मराठा ठोक मोर्चा): कोल्हापुरात बुधवारी दसरा चौक येथे सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)