वडणगे येथे कॉग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 04:36 PM2021-06-08T16:36:31+5:302021-06-08T16:45:08+5:30
Congress PetrolHike Kolhapur : वडणगे (ता.करवीर) येथे कॉग्रेसच्या वतीने पेट्रोलियम पदार्थ व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आयोजित निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
कोल्हापूर : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने इंधनासह जीवनावश्यक वस्तूची भाववाढ करुन सामान्य माणसांसह अर्थव्यवस्था उध्दवस्त केल्याची टीका आमदार पी. एन. पाटील यांनी केली.
वडणगे (ता.करवीर) येथे कॉग्रेसच्या वतीने पेट्रोलियम पदार्थ व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आयोजित निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या . यावेळी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती बी. एच. पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, केवलसिंह रजपुत, रविंद्र पाटील, एम. जी .पाटील, सुरेश पाटील , एम. बी. कीडगावकर , सचिन चौगले , दत्ता पाटील , जयसिंग पाटील , पंडीत नलवडे , धनाजी चौगले, बाजीराव लाड, विश्वास कदम आदी उपस्थित होते.