ठळक मुद्देवडणगे येथे कॉग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शनेकेंद्र सरकारने अर्थव्यवस्था उध्वस्त केली : पी.एन.पाटील
कोल्हापूर : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने इंधनासह जीवनावश्यक वस्तूची भाववाढ करुन सामान्य माणसांसह अर्थव्यवस्था उध्दवस्त केल्याची टीका आमदार पी. एन. पाटील यांनी केली.वडणगे (ता.करवीर) येथे कॉग्रेसच्या वतीने पेट्रोलियम पदार्थ व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आयोजित निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या . यावेळी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती बी. एच. पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, केवलसिंह रजपुत, रविंद्र पाटील, एम. जी .पाटील, सुरेश पाटील , एम. बी. कीडगावकर , सचिन चौगले , दत्ता पाटील , जयसिंग पाटील , पंडीत नलवडे , धनाजी चौगले, बाजीराव लाड, विश्वास कदम आदी उपस्थित होते.