रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. गोरगरीब रुग्णांना उपकेंद्राच्या माध्यमातून उत्तम आरोग्य सेवा द्या. वयोवृद्ध, मधुमेह, रक्तदाब रुग्ण, गरोदर महिला यांची विशेष काळजी घ्या, असे प्रतिपादन गंगाधर व्हसकोटी यांनी केले. हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील उपकेंद्रामध्ये नव्याने रूजू झालेले समुदाय आरोग्य अधिकारी राहुल वायदंडे यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी गंगाधर व्हसकोटी, एन. आर. पाटील, आरोग्यसेविका अर्चना शिंदे, सरदार परीट, दुंडाप्पा पाटील, मेघा पाटील, अंबिका चिकबसर्गे, संगीता नाईक उपस्थित होते. एन. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. अर्चना शिंदे यांनी आभार मानले.
-------------------
* फोटो ओळी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील उपकेंद्राचे डॉ. राहुल वायदंडे यांचा सत्कार करताना गंगाधर व्हसकोटी. शेजारी एन. आर. पाटील, अर्चना शिंदे आदी उपस्थित होते.
क्रमांक : १५१०२०२०-गड-०१