कोल्हापूर : येथील कोल्हापूर महानगरपालिका खासगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने उत्साहात पार पडली. या सभेत पतसंस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहकांना कॅशलेस, पेपरलेस सुविधा देण्याची सुरूवात केली जाणार असल्याचे अध्यक्ष महादेव डावरे यांनी सांगितले.
सभासद राजेंद्र कोरे, संतोष आयरे, विश्वास केसरकर, आदींनी नेट मोबाईल बँकिंग, क्यूआर कोड, बीबीपीएस, एटीएम सुविधेची मागणी केली होती. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असे डावरे यांनी सांगितले. राजेश कोंडेकर यांनी अहवाल सादर केला. विविध योजना त्यांनी जाहीर केल्या. यावेळी पांडुरंग गवळी, आदींनी विचारलेल्या प्रश्नांना संस्थेचे संस्थापक भरत रसाळे, कार्यकारी संचालक सदाशिव साळवी यांनी उत्तरे दिली. नोटीस वाचन छाया हिरुगडे यांनी केले. यावेळी आनंदा हिरुगडे, शिवाजी भोसले, बाळासाहेब लंबे, सारिका पाटील, विकास कांबळे, राजाराम हुल्ले, अशोक पाटील, अनिल सरक, चंद्रकांत पाटील, सूर्यकांत बरगे, सुनील आबदार, आनंदा डावरे, यशवंत कोळी, अरुण गोते, माणिक सपाटे, उज्ज्वला जाधव उपस्थित होते. मच्छिंद्र नाळे यांनी सूत्रसंचालन केले तर कुमार पाटील यांनी आभार मानले.
फोटो (३१०३२०२१-कोल-शिक्षक सेवक पतसंस्था) : कोल्हापूर महानगरपालिका खासगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने उत्साहात पार पडली.
===Photopath===
310321\31kol_6_31032021_5.jpg
===Caption===
फोटो (३१०३२०२१-कोल-शिक्षक सेवक पतसंस्था) : कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने उत्साहात पार पडली.