कोल्हापूर : कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ‘यामाहा ट्रेनिंग स्कूल व केंद्र शासनाच्या ‘ॲटोमोटिव्ही स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिल’ यांच्यावतीने घेण्यात आलेल्या दुचाकी दुरुस्ती व देखभाल प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या अभ्यासक्रमात स्वयंचलित वाहनांची दुरुस्ती, देखभाल, निगा राखणे अशी संबंधित कामे शिकवली जातात. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यामाहा डिलरशीपमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी सहायता केली जाते. त्याप्रमाणे यशस्वी विद्यार्थी स्वत:चे गॅरेजचा व्यवसाय काढण्यासाठी सक्षम होतो. हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना यामाहा व ए. एस. डी. सी कडून अधिकृत प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी समन्वयक जितेंद्र पाटील यांच्याकडे संपर्क साधावा. असे आवाहन प्राचार्य पट्टलवार यांनी केले आहे.