केसकर्तनालयाचा व्यवसाय हा परंपरागत नाभिक समाज करतो. यातून तुटपुंजे उत्पन्न मिळते. तर हा समाज भूमिहीन असल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह दररोज मिळणाऱ्या कमी उत्पन्नातून भागविली जाते. परंतु या व्यवसायिकांनी लाॅकडाऊनच्या काळात शासनाने आतापर्यंत कोणतीही मदत दिलेली नाही.
मात्र शासनाच्या नियमावलीत हा व्यवसाय बंद करण्याची सर्वप्रथम घोषणा केली जाते. तर राजकीय मंडळी स्टार प्रचारक म्हणून कौतुकाची शब्बासकी देतात. मदतीसाठी स्थानिक आमदाराकडे निवेदन देऊन देखील दुर्लक्ष केले गेले आहे. लाॅकडाऊनमुळे या समाजाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे ; मात्र सध्या व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते,व दुकान भाडे देण्याची भ्रांत निर्माण झाली असल्याचे नाभिक संघटना पन्हाळा तालुका उपाध्यक्ष पांडुरंग संकपाळ यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. पत्रकार बैठकीला महादेव पोवार,युवराज संकपाळ,अर्जून संकपाळ,आनंदा संकपाळ,नंदकुमार पोवार उपस्थित होते.