Hasan Mushrif On Salman Khan ( Marathi News ) : शनिवारी रात्री माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची तीन हल्लेखोरांनी गोळीबार करत हल्ला केला. या हल्ल्यात बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदार लॉरेन्स बिश्नोई याने घेतली आहे. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खान याच्यासोबत या हत्येचे कनेक्शन जोडले आहे. दरम्यान, आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी सलमान खान याच्या जवळच्या व्यक्तींना विशेष सुरक्षा देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
Big Breaking: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कारला टोलमाफी
"विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर टीका करणे हे काम आहे. अचानक कोणतर येतो आणि रिव्हॉव्हर काढून गोळीबार करतो, आपलं २४ तास लक्ष असत नाही. पोलिसांचे लक्ष असले पाहिजे, कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक असला पाहिजे हे खरं आहे. पण, अशा पद्धतीच्या संघटना जर काक करत असतील तर पोलिसांनीही विशेष लक्ष दिले पाहिजे, असंही मंत्री मुश्रीफ म्हणाले.
यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी अभिनेता सलमान खान यांच्या जवळच्या व्यक्तींना राज्य सरकारने विशेष सुरक्षा दिली पाहिजे, अशा मागणीही त्यांनी केली. अशा पद्धतीने दिवसा ढवळ्या हत्या होत असतील तर हे बरोबर नाही हे खरं आहे, असंही मुश्रीफ म्हणाले.
सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. याच दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट पटियाला जेलमध्ये रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितलं की, पटियाला जेलमधील लॉरेन्स बिश्नोई गँगच्या काही लोकांनी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट रचला होता. हत्येच्या कटात मोहम्मद झिशान अख्तरचे नाव पुढे आलं होतं. त्याने हे सर्व प्लॅनिंग केल्याचं म्हटलं जात आहे.
गुरमेल सिंह, धर्मराज कश्यप आणि शिव कुमार यांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला होता. यापैकी धर्मराज आणि गुरमेलला अटक करण्यात आली आहे, तर झिशान, शुभम लोणकर आणि शिव कुमार फरार आहेत. त्यानंतर प्रवीण लोणकरलाही पोलिसांनी अटक केली. प्रवीण आणि शुभम हे भाऊ आहेत.