कोल्हापूर : कोरोना विषाणूमुळे पंचगंगा स्मशानभूमीत रोज अनेक मृतदेहांवर अंत्यविधी पार पडत आहेत. या अंत्यविधीसाठी रोज चाळीस हजार शेणीची गरज असते. याचे सामाजिक भान ठेवून येथील शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी लोककला सामाजिक, सांस्कृतिक फाउंडेशनने शनिवारी सुमारे २५ हजार शेणी पंचगंगा स्मशानभूमीसाठी प्रदान केल्या.
कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहायक आयुक्त विनायक औंधकर यांच्याकडे कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटीचे जाफर बाबा सय्यद यांच्या हस्ते या २५ हजार शेणी सुपूर्द करण्यात आल्या. अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक पाटील, अधीक्षक अभियंता सुरेश बच्चे, कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या डॉ. रेश्मा पवार, बांधकाम व्यावसायिक अजयसिंह देसाई, डॉ. आझाद नायकवडी यांनी प्रत्येकी पाच हजार शेणी फाउंडेशनकडे जमा केल्या होत्या.
शिवाजी विद्यापीठाच्या आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष डॉ. प्रवीण कोडोलीकर, माजी सभापती बंकट थोडगे, क्रीडा शिक्षक रघुनाथ पाटील, सुधाकर भांदिगरे, मनसेचे शहराध्यक्ष मंदार पाटील, मणदूर गावचे सरपंच यशवंत जाधव, आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. आझाद नायकवडी यांनी समाजातील विविध सामाजिक संस्थांनी, दानशूर व्यक्तींनी जास्तीत जास्त शेणी दान करून अंत्यसंस्कारांसाठी शेणी कमी पडणार नाहीत, याची सामाजिक जबाबदारी घ्यावी, असे आवाहन केले. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने फाउंडेशनचे आभार मानले.
(बातमीदार संदीप आडनाईक)
----------------------------------------------------------------------------------
फोटो : 15052021-kol-Azad naykavdi foundation
फोटो ओळी : कोल्हापुरात आझाद नायकवडी फाउंडेशनमार्फत शनिवारी पंचगंगा स्मशानभूमीसाठी २५ हजार शेणी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी अरविंद कांबळे, यशवंत जाधव, आझाद नायकवडी, बंकट थोडगे, जाफरबाबा सय्यद, सहायक आयुक्त विनायक औंधकर, डॉ. प्रवीण कोडोलीकर, रघुनाथ पाटील, मंदार पाटील, सुधाकर भांदिगरे आदी उपस्थित होते.
===Photopath===
150521\15kol_1_15052021_5.jpg
===Caption===
फोटो : 15052021-kol-Azad naykavdi foundationफोटो ओळी : कोल्हापूरात आझाद नायकवडी फौंडेशनमार्फत शनिवारी पंचगंगा स्मशानभूमीसाठी २५ हजार शेणी महानगरपािलकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी अरविंद कांबळे, यशवंत जाधव, आझाद नायकवडी, बंकट थोडगे, जाफरबाबा सय्यद, सहायक आयुक्त विनायक औंधकर, डॉ. प्रविण कोडोलीकर, रघुनाथ पाटील, मंदार पाटील, सुधाकर भांदीगरे आदी उपस्थित होते.