लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा परिषद आणि चार नगरपरिषदांमध्ये शिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यातील एक लाख २० हजार २०६ विद्यार्थ्यांना गणवेशापोटी चार कोटी ८० लाख ८२ हजार रुपये अदा करण्यात येणार आहेत. शाळा व्यवस्थापन समितीकडे हा निधी वर्ग करण्यात येणार असून, त्यानंतर तो विद्यार्थी, पालकांच्या संयुक्त खात्यावर जमा करण्यात येणार आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जमातीची मुले, अनुसूचित जातीची मुले, तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना गणवेश उपलब्ध करून दिले जातात. आता थेट गणवेश देण्याऐवजी थेट अनुदान पद्धतीने बँक खात्यावर दोन गणवेश संचाचे ४०० रुपये जमा करण्यात येणार आहेत. तालुकापात्र विद्यार्थीअनुदानआजरा४४३४१७७३६००भुदरगड६०९९२४३९६००चंदगड८२९९३३१९६००गडहिंग्लज७६१४३०४५६००गगनबावडा२१७६८७०४४हातकणंगले२०८८०८३५२०००कागल१०६८५४२७४०००करवीर१७५७०७०२८०००शिरोळ१३५४५५४१८०००पन्हाळा१०२१७४०८६८००राधानगरी०९०८४३६३३६००शाहूवाडी०९६०३३८४१२००एकूण१२०२०६४८०८२४००प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेशांचे ४०० रुपये मिळणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आईने किंवा वडिलांनी मुलासह आपले संयुक्त खाते राष्ट्रीयीकृत बँकेत काढणे आवश्यक आहे.पालकांनी लवकरच ही खाती काढावीत.- सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी.
गणवेशापोटी पाच कोटींची तरतूद
By admin | Published: June 10, 2017 12:48 AM