शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

गरिबीशी झुंजत सुजाता झाली पीएसआय

By admin | Published: June 19, 2015 11:28 PM

कवठेएकंदची कन्या : प्रेरणादायी यश, तरुणांपुढे ठेवला आदर्श

प्रदीप पोतदार- कवठेएकंद -भरकटलेली तरुण पिढी, अभ्यासाच्या आणि शिक्षणाच्या नावावर उधळपट्टी करणारे विद्यार्थी, कुटुंब, समाज आणि माणुसकीबद्दल आस्था नसणारे युवक, अशी स्थिती सर्वत्र दिसत असताना, कवठेएकंद (ता. तासगाव) येथील सुजाता या तरुणीने गरिबीशी झुंज देत मोठ्या जिद्दीने पीएसआय परीक्षेत बाजी मारली. सुजाता शिवाजी पाटील हिने कवठेएकंदच्या इतिहासात पहिली पोलीस उपनिरीक्षक बनून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.दगड-मातीचं चारखणी छोटंसं घर, वडिलोपार्जित एक एकर शेती, यावरच आई-वडिलांच्या श्रमातून कुटुंब चालायचं. परिस्थितीमुळे लहान भाऊ बालपणापासूनच मामाकडे शिकायला. आई, वडिलांचे कष्ट वाया जाऊ द्यायचे नाहीत, अशी जिद्द उराशी बाळगून सुजाताने दहावीपर्यंतचे शिक्षण कवठेएकंद येथे, तर बारावी सायन्सचे शिक्षण तासगावमधून पूर्ण केले. विज्ञान शाखेत तिने ६० टक्के गुण प्राप्त केले. त्यानंतर मामाच्या मदतीने ती मुंबईला गेली. २००९ मध्ये पोलीस भरती परीक्षेत जेमतेम उत्तीर्ण होऊन अवघ्या १९ व्या वर्षी पोलीस शिपाई म्हणून नोकरीला लागली. बोरीवली (ईस्ट) येथे कार्यरत असताना विशेष प्रावीण्यही प्राप्त केले. २०१३ मध्ये तिने पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली, पण यश आले नाही. पुन्हा २०१४ च्या पीएसआय परीक्षेत मात्र ४३० पैकी १९१ गुण मिळवून ती यशस्वी झाली. राज्यात तिने ६ व्या क्रमांकाचे यश प्राप्त केले. वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रसेवेत रूजू होत असल्याचे सांगून, परिस्थितीनुसार घडत गेले, अशी बोलकी व नेमकी प्रतिक्रिया तिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. आई, वडिलांनी शेती आणि मोलमजुुरी करून सुजाताला प्रोत्साहन दिले. घरची काळजी न करता तिच्या शिक्षणासाठी, अभ्यासासाठी पैसा खर्च केला.जनावरांचे संगोपन करून आई सुमन पाटील यांनी कुटुंबाला आधार देऊन सुजाताला घडविले. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाले. सुजाताने परिस्थितीशी संघर्ष करून मिळविलेले हे यश युवक-युवतींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. आईचे कष्ट सार्थकी आईच्या कष्टामुळे प्रेरणा मिळाली. परिस्थितीशी झगडत गरजा पूर्ण केल्या. आईचे कष्ट सार्थकी लागले, अशी भावना सुजाताने व्यक्त केली.