कोल्हापूर : भारताचे पहिले ऑलिंपिंक पदक विजेते खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळण्यासाठी आवश्यक गोष्टींची पुर्तता केली जाईल. असे आश्वासन भारताच्या सुवर्णकन्या व भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा खासदार पी.टी.उषा यांनी दिले. याबाबत खाशाबांचे पुत्र रणजित जाधवयांनी सोमवारी दिल्ली येथे उषा यांची भेट घेतली. या भेटीप्रसंगी झालेल्या चर्चेत त्यांनी त्या बोलत होत्या.
पी.टी.उषा म्हणाल्या, १९५२ साली भारताला पहीले पदक खाशाबा जाधव यांनी मिळवून दिले. त्यानंतरच्या अनेक खेळाडूंना पद्म पुरस्कार मिळाला. मात्र, त्यांना मरणोत्तरही मिळाला नाही. ही बाब गंभीर आहे. याबाबत मी स्वत: जातीनिशी लक्ष घालून आवश्यक बाबींची पुर्तता केली जाईल. हवे ते सहकार्यही करून पद्म पुरस्कार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
यावेळी कुस्ती मल्लविद्या महासंघाचे मुख्य प्रवक्ते संग्राम कांबळे, एस.पी. फौंडेशनचे सचिन पाटील, उमेश माने, राकेश माेरे, भारतीय स्पोर्टस चे व्यवस्थापक सर्वेश केडीया आदी उपस्थित होते.