शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

पीटीएम, दिलबहार पुढील फेरीत अटल चषक फुटबॉल स्पर्धा : उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम, पोलीस संघ पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 12:05 AM

कोल्हापूर : नेताजी तरुण मंडळाच्यावतीने आयोजित ‘अटल चषक’ फुटबॉल स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात पीटीएम ‘अ’ने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळावर ४-० अशा गोलफरकाने, तर दिलबहार तालीम मंडळाने

कोल्हापूर : नेताजी तरुण मंडळाच्यावतीने आयोजित ‘अटल चषक’ फुटबॉल स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात पीटीएम ‘अ’ने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळावर ४-० अशा गोलफरकाने, तर दिलबहार तालीम मंडळाने कोल्हापूर पोलीस संघावर १-० अशा गोलफरकाने मात केली.

राजर्षी छत्रपती शाहू स्टेडियमवर पहिला सामना पीटीएम ‘अ’ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यामध्ये झाला. सामन्यात प्रारंभापासून पीटीएम संघाने सामन्यावर पकड निर्माण करण्यास सुरुवात केली. यामध्ये ‘पीटीएम’ संघाकडून हृषिकेश मेथे-पाटील याने ३३ व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत ‘पीटीएम’ संघाने आघाडी कायम राखली.

उत्तरार्धात ‘उत्तरेश्वर’ संघाकडून प्रकाश संकपाळ, इंडो गिल्बर्ट, रविराज भोसले, सुयश हंडे यांच्याकडून आघाडी कमी करून खाते उघडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, समन्वयाअभावी त्यांच्या चढाया फोल ठरल्या. यावेळी ‘पीटीएम’ संघाकडून ओंकार जाधवने ५५ व्या मिनिटाला, ७० व्या मिनिटाला हृषीकेश मेथे-पाटीलने, तर ७७ व्या मिनिटाला राजेंद्र काशीद याने गोल करत सामन्यात ४-० अशी भक्कम पकड निर्माण केली. ही आघाडी सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली.

दुसरा सामना दिलबहार तालीम ‘अ’ विरुद्ध कोल्हापूर पोलीस फुटबॉल संघ यांच्यामध्ये झाला.सामन्याच्या प्रारंभी दोन्ही संघांनी बचावात्मक खेळी करण्यास सुरुवात केली. दिलबहार तालीम मंडळाकडून सनी सणगर, जावेद जमादार यांनी खोलवर चढाया करत पोलीस

संघाची बचावफळी भेदण्यास सुरुवात केली. त्यामध्ये ३५ व्या मिनिटाला करण चव्हाण-बंदरेनेगोल करत दिलबहार संघाला मध्यंतरापर्यंत आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात दोन्ही संघांकडून गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, समन्वयाअभावी गोल करता आला नाही. शेवटपर्यंत दिलबहारची आघाडी कायम राहिली.समर्थक गॅलरीतून कोसळलापीटीएम विरुद्ध उत्तरेश्वर यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात ‘पीटीएम’ संघाने गोल करताच प्रेक्षक गॅलरीत बॅरिकेटवर चढून एक समर्थक नाचत होता.नाचताना तोल जाऊन तो गॅलरीतून खाली मैदानात पडला. मात्र, सुदैवाने त्याला कोणतीही इजा झाली नाही, तर सामन्याच्या दरम्यान दोन्ही संघांच्या समर्थकांनी प्रेक्षक गॅलरीतून अश्लील शिवीगाळ केल्याने काहीकाळ वातावरण तंग झाले होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल