कोरोनाचा धोका व वाढत्या रुग्णसंख्येवर पर्याय म्हणून शनिवारपासून तीन दिवसीय जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे, तर आढावा घेऊन आणखी दोन दिवस जनता कर्फ्यू लावण्याची शक्यता आहे, तर
पद्मा रोडवर मोरनी साडी दुकान तर समृद्धी पॅशन हाऊसवर कारवाई करत दहा हजार दंड करण्यात आला. या पार्श्वभूमीवर वडगावमध्ये सर्व व्यवहार ठप्प होते. कुणीही बाहेर पडले नसल्याने शांतता दिसून आली. दवाखाने शिवाय सर्वच बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता, तर मेडिकल, दूध, पीठगिरणी ठरावीक वेळेत सुरू ठेवण्यात येतात. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळली. तर काही बेजबाबदार रस्त्यावर आले. त्यांच्यावर पोलीस व प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला. त्यामुळे जनता कर्फ्यूस चांगला प्रतिसाद मिळाला.
फोटो ओळ : पेठवडगाव : येथील पालिका चौकात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊनमुळे असा शुकशुकाट होता. (छाया : संतोष माळवदे)