गावामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. तीन रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. तरीही ग्रामस्थांमध्ये याचे गांभीर्य दिसून येत नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समितीने शुक्रवार (दि. १४) पर्यंत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.
या कालावधीत उद्योग व व्यवसाय सुरू ठेवल्यास ५०० रुपये, विना मास्क २०० रुपये, विनाकारण फिरताना आढळल्यास २०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्यास २०० रुपये, विहिरीवर अंघोळीसाठी व विनाकारण कट्ट्यावर बसणारे ५०० रुपये अशी दंड आकारणी करण्यात येणार आहे.
पार्वती औद्योगिक वसाहतीसह व परिसरामध्ये परवाना नसतानाही कारखाना चालू असल्याचे आढळल्यास पाच हजार रुपये दंड व एक महिना कारखाना बंद ठेवण्यात येणार आहे.
फोटो - ०७०५२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळी : यड्राव (ता. शिरोळ) येथे जनता कर्फ्यूच्या प्रबोधनासाठी सुरक्षा रक्षकांनी संचलन केले.