शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

लोककलावंतांचे दर्शन ग्रामीण भागात दुर्मीळ

By admin | Published: October 27, 2014 9:16 PM

कला विस्मृतीत : नवीन पिढीचा नकार

पुनवत : ग्रामीण भागात सुगीच्या दिवसात येऊन लोकांची करमणूक करुन वर्षाकाठीचा आपल्या हक्काचा धान्याचा वाटा मागणारे लोककलावंत काळाच्या ओघात आता दुर्मीळ झाल्यामुळे ग्रामीण गाववाड्यातील आनंद हरवत चालला आहे. सतत बदलत जाणारी सामाजिक स्थिती व नव्या पिढीचा आधुनिक दृष्टिकोन, यामुळेच लोककलावंतांची कला लोप पावत चालली आहे.ग्रामीण भागात पूर्वीचे सुगीचे दिवस किती मजेदार असायचे. गावा-गावात निघणारी खळी, खळ्यावर धान्याच्या राशी, दिवसभर दमून-भागून पिकांची काढणी, मळणी करणारे शेतकरी, सायंकाळी केली जाणारी मळणी, मळणीत चालणारा पैरा व दुसऱ्या दिवशी दारावर किंवा खळ्यावर हमखास टपकणारा एखादा लोककलावंत, हे चित्र आता विस्मृतीत जाऊ लागले आहे. ग्रामीण भागातील कष्टकरी जनतेच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी किंवा लोकजागृतीसाठी नंदीवाला, कडकलक्ष्मी, मदारी, दरवेशी, गारुडी, पोतराज, बहुरुपी, वासुदेव, डोंबारी, कोंबड्याचा खेळ करणारा गोपाळ, हलगीवाला, वाघ्यामुरळी, पिंगळा जोशी, कुडमुडे जोशी, ज्योतिषी, नवनाथ जोगती, गोंधळी असे एक ना अनेक कलावंत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊन लोकांची करमणूक करुन आपल्या हक्काचा धान्याचा वाटा मागायचे. लोकांना आशीर्वाद देत पुढच्या वर्षी नक्की येण्याचे आश्वासन देऊन आपल्या गावाकडे वळायचे. काळाच्या ओघात ग्रामीण भागातील हे चित्र आता मागे पडले आहे. खवरेवाडी (ता. शिराळा) येथे एकट्याच आलेल्या, कोंबड्याचा खेळ करणाऱ्या गोपाळाला सहज विचारले, ‘‘दादा, एकटाच आलास, तुझा कोंबडा (मुलगा) कुठाय?’’ त्यावर तो सफाईदारपणे म्हणाला, ‘‘साहेब, कोंबडा आता मोठा झालाय. नवीन पिढीत हे काम करायला कोण तयार न्हाय. म्हणून एकटाच आलो.’’कलावंतांच्या समाजातही आधुनिकतेचे वारे घुसल्याने त्यांची नवीन पिढीतील मुलं नोकरी, धंद्याकडे वळाल्याने, लोककलावंतांचं येणं दुर्मीळ झाले आहे. ग्रामीण समाजजीवनातील लोककलावंतांची कला काळाच्या पडद्याआड जाऊ लागली आहे. (वार्ताहर)