शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

जनता बझारमुळे मनपाचे सव्वा कोटीचे नुकसान

By admin | Published: January 21, 2016 11:54 PM

चुकीची घरफाळा आकारणी : संभाजी जाधव यांची कारवाईची मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर जनता सेंट्रल को-आॅप. कंझ्युमर्स स्टोअर्स (जनता बझार)च्या भाडेकराराची तीस वर्षांची मुदत संपल्यानंतर दोन वर्षांपूर्वी नवीन तीस वर्षे मुदतीचा भाडेकरार केला आहे. मात्र, गेल्या २१ महिन्यांत जनता बझारने पावणेदोन कोटी थकबाकी भरली नाही. बझारच्या तीन इमारतींचा व्यावसायिक दराप्रमाणे घरफाळा न आकारल्याने महापालिकेस सुमारे १ कोटी १४ लाख ६७ हजार ५४६ रुपये नुकसान झाले आहे. या नुकसानीस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते संभाजी जाधव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. जाधव म्हणाले, जनता बझार यांनी १९७९ ते २००९ दरम्यान तीस वर्षे मुदतीने स्थायी समितीच्या मंजुरीप्रमाणे भाड्याने दिलेली मुदत दि. १६ आॅक्टोबर २००९ रोजी संपली त्यानंतर १ मार्च २०१४ रोजी तीस वर्षे मुदतीचा करार केला; पण पहिल्या कराराची मुदत संपल्यानंतर दि. १६ आॅक्टोबर २००९ ते १ मार्च २०१४ पर्यंत कोणतीही मंजुरी व मुदतवाढ न घेता जनता बझारने जागेचा वापर केला. जर वेळीच मुदतवाढ घेतली असती तर भाडेवाढ करुन महापालिकेचा आर्थिक फायदा झाला असता; पण पाच वर्षांचे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सन २०१४ मध्ये महापालिकेच्या राजारामपुरी येथील इमारतीचे भाडे ५,३२,९२४ रुपये, रुईकर कॉलनी येथील इमारत भाडे ७० हजार रुपये, ए वॉर्ड वरुणतीर्थ येथील इमारत १,४६,६६० रुपये दरमहा भाडेतत्त्वावर दिली आहे. या तिन्हीही इमारतींचे २९ डिसेंबर २०१५ अखेर १ कोटी ७४ लाख २९ हजार २९८ रुपये इतकी थकबाकी भरलेली नाही. महानगरपालिका व जनता बझार यांच्यातील करारानुसार भाडे दरमहा १० तारखेला देणे आवश्यक आहे. तसे न दिल्यास दर शेकडा १५ टक्के दराने व्याजासह भाडे देण्याची जबाबदारी भाडेकरूंनी स्वीकारली होती. यामुळे करारात त्यातूनही दोन महिन्यांपेक्षा जास्त भाडे देण्याचे राहिल्यास संबंधित मिळकत परत महापालिकेच्या कब्जात देण्याचे किंवा महापालिकेस तिचा कब्जा घेण्याचा अधिकार राहील, असे म्हटले आहे. तरीही जनता बझारकडून कोट्यवधींच्या रकमेची थकबाकी असताना या मिळकती महापालिकेने ताब्यात घेतलेल्या नाहीत.रुईकर कॉलनी, बागल मार्केट, वरुणतीर्थ वेश येथील इमारतींना व्यापारी दराप्रमाणे भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी केलेली नाही. त्यामुळे महानगरपालिकेस १ कोटी १४ लाख, ६७ हजार ५४६ रुपये नुकसान झालेले आहे. जनता बझारने कराराचा भंग केल्याने तो रद्द होऊन तत्काळ या सर्व इमारती महापालिकेने ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी आपण आयुक्तांकडे करणार असल्याचेही विरोधी पक्षनेते संभाजी जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)करारातील तरतुदीनुसार या इमारतीमध्ये पोटकूळ ठेवता येत नाही. मात्र, बागल मार्केट (राजारामपुरी) मधील इमारतीत पिझ्झा हट व आदित्य बिर्ला गु्रप हे पोटकूळ ठेवले आहे. जनता बझारमधील पिझ्झा हट या दुकानात २० रुपयांची बिसलेरी बाटली ४० रुपये दराने विकली जात आहे. त्यामुळे निव्वळ फायदा मिळविण्याच्या दृष्टीने या कंपन्यांची पोटकुळे ठेवली आहेत.