कोल्हापूर : शहरातील शंभर कोटी रस्त्यांची कामे का झाली नाहीत ? दिवाळीपूर्वी शहरातील रस्त्यावरील खड्डे मुजवा असे मी सांगितले होते. का झाले नाही ? आयुक्तांना आयुक्त म्हणून राहण्यात इंटरेस्ट आहे की कलेक्टर होण्यात आहे हे मला माहीत नाही. कलेक्टर आता तुम्ही होणार नाही कारण सिंधुदूर्गमध्ये चार ते पाच वर्षे कलेक्टर म्हणून काम केले आहे, अशा कडक शब्दात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची खडपट्टी केली. कसबा बावड्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या लोकार्णण सोहळ्यातील जाहीर कार्यक्रमात त्यांनी आज, शनिवारी 'लोकमत'ने दिलेल्या ‘पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडून शहरातील प्रश्न बेदखल’ या मथळ्याखाली वृत्ताची गंभीर दखल घेवून त्यांनी प्रशासक मंजुलक्ष्मी यांनाही सुनावले.पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, पालकमंत्री झाल्यानंतर महापालिकेत आढावा बैठक घेवून शहरातील प्रश्न तातडीने सोडवण्याचे आदेश दिले होते. तरीही दूर्लक्ष होत असल्याने वृत्तपत्रातून बदनामी होत आहे. शंभर कोटींचा निधी मिळूनही रस्ते होत नाहीत हे दुदैव आहे. कमिशनसाठी रस्ते होत नाहीत, वृत्तपत्रातून आले आहे. हे गंभीर आहे.झूम प्रकल्पातील मंजूर प्रकल्पाचे वर्क ऑर्डर देण्यासाठी मी पाठपुरावा केला. तरी अजूनही दिलेले नाही. त्या चार दिवसात वर्क ऑर्डर द्या, नाही तर अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांना बदला. ते ग्रामविकासचे आहे. त्यांना मीच नगरविकासला आणले आहे. विकास कामे रेंगाळणे बरोबर नाही. लोक टीका करतात. पालकमंत्र्यांच्या नावे आरोप होतात.
Kolhapur: पालकमंत्र्यांकडून महापालिका अधिकाऱ्यांची जाहीर खरडपट्टी, 'लोकमत'च्या वृत्ताची गंभीर दखल
By भीमगोंड देसाई | Published: December 16, 2023 1:41 PM