कोल्हापूर : आकर्षक पशु-पक्षी... विविध जातींची वनस्पती, कृषी उपयोगी आधुनिक साहित्याचे स्टॉल व त्यात आज, रविवार सुटीचा दिवस असल्याने भीमा कृषी-पशुपक्षी पाहण्यासाठी मेरी वेदर ग्राउंडवर कोल्हापूरसह शेजारील जिल्ह्णांतून अक्षरश: जनसागर उसळला. राज्यासह कर्नाटक, गोवा व आंध्रप्रदेश येथील शेतकऱ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. शेतकऱ्यांसह कृषीविषयक नवीन तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी शेती महाविद्यालयाच्या विद्यार्थी व बचत गटाच्या महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. भीमा उद्योगसमूह, जिल्हा परिषद, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व ‘आत्मा’ यांच्या संयुक्त विद्यमाने मेरी वेदर ग्राउंडवर कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. गेले तीन दिवस सुरू असलेल्या प्रदर्शनाचा उद्या, सोमवारी शेवटचा दिवस आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी गर्दी ओसंडून वाहत होती. कोल्हापूर-कसबा बावडा हा मार्ग दिवसभर गर्दीन व्यस्त राहिला. प्रत्येक स्टॉलच्या ठिकाणी पाय ठेवण्यासही जागा नव्हती, इतकी गर्दी शेतकऱ्यांनी केली होती. प्रदर्शनाला आमदार उल्हास पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. ते म्हणाले, या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती होण्यास मदत होणार आहे. ऊसतज्ज्ञ डॉ. डी. जी. हापसे म्हणाले, शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाच्या उदारनिर्वाहापुरत्या उसाचे उत्पादन काढावे. जमिनीचे व्यवस्थापन, सेंद्रिय द्रव्यांचा वापर, शास्त्रीय नांगरण पद्धती व पाण्याचा योग्य वापर यांचा काटेकोर वापर करावा.झुणका-भाकरीचे वाटपदिवसभर प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी झुणका-भाकरीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आज भगीरथी महिला मंडळाच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, समीर सेठ, मिलिंद धोंड यांच्या हस्ते झुणका-भाकरीचे वाटप झाले. प्रदर्शनातील आकर्षण
सहा स्तन असलेली म्हैसचार लाखांचे खिलार खोंड१३८० किलो वजनाचा मुऱ्हा जातीचा रेडामहाराष्ट्र चॅम्पियन होस्टन फ्रिजन जातीची गायआफ्रिकन बोर जातीचा ६५ किलोंचा मेंढाराजस्थानी शिरोई जातीची शेळी८० किलोंचा बोकड२० किलो टर्की जातीची कोंबडीपर्शियन मांजर, न्यूझीलंडचा पांढरा ससा, अमेरिकन घूस, पांढरे उंदीर, काठेवाडी-पंजाबी व मारवाडी जातींचे घोडे.पशुपक्ष्यांची आरोग्य तपासणीदुपारच्या सत्रात प्रदर्शनात सहभागी झालेल्या पशुपक्ष्यांची आरोग्य तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. यावेळी तज्ज्ञांकडून पशुपालकांना मौल्यवान सल्लेही देण्यात आले.