लेखक आवडे यांनी या पुस्तकात आपल्यापरीने त्यावेळच्या परिस्थितीचा आणि त्याकाळातील सर्व साधनांचा पुरेपूर अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक पुढील काळात युवा पिढीसाठी वरदान ठरणार आहे. लेखक आवडे हे विद्युत मंडळातून वरिष्ठ पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांनी दलित चळवळीसह कामगार क्षेत्राविषयी लेखन केले असल्याचे वसंतराव मुळीक यांनी सांगितले. या पुस्तकात शककर्ते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची कारकीर्द तसेच पुण्याचे पेशवे यांच्या कालखंडाचा धावता आढावा घेतला असल्याचे लेखक आवडे यांनी सांगितले. यावेळी मल्हार सेनेचे सरसेनापती बबन रानगे, संभाजीराव मांजगावकर,सचिन इंगवले, अवधूत पाटील उपस्थित होते.
फोटो (१९०७२०२१-कोल-शिवशाही पुस्तक) : कोल्हापुरात ‘शिवशाही आणि पेशवाई कालखंडातील सामाजिक जीवन’ या पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते झाले. यावेळी शेजारी गुलाबराव आवडे, बबन रानगे, अवधूत पाटील, आदी उपस्थित होते.