कोल्हापूर : येथील राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आठवीत शिकणाऱ्या सोहा सुनील दाबडे या विद्यार्थिनीने कोरोनाकाळात लहान मुलांसाठी लिहलेल्या ‘डोसा ज हार्डशिप्स’ या कथासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका व कवयित्री नीलांबरी कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
या पुस्तकाचा छोटेखानी प्रकाशन समारंभ शाळेमध्येच तिच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका अनुजा वणकुद्रे होत्या.
यावेळी निलांबरी कुलकर्णी यांनी स्वत:च्या आंतरिक प्रेरणांशी कायम प्रामाणिक राहण्याचे आवाहन करून हुशारी व शहाणपण यांतील अंतर मुलांना समजावून सांगितले. विपरीत परिस्थितीत कथालेखनाचा छंद जोपासून सर्जनाची वाट चोखाळल्याबद्दल त्यांनी सोहा व तिच्या पालकांचे कौतुक केले. यानंतर सोहाने कथेचे सादरीकरण केले. यावेळी आई सोनल दाबडे, वडील सुनील दाबडे, आजोबा डॉ. प्रकाश बगाळे, ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांच्यासह पालक उपस्थित होते.
..........
फोटो नं ०६०२२०२१-कोल-सोहा दाबडे बुक
ओळ : कोल्हापुरातील राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सोहा सुनील दाबडे या विद्यार्थिनीने लिहिलेल्या ‘डोसा ज हार्डशिप्स’ या कथासंग्रहाचे प्रकाशन कवयित्री नीलांबरी कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी अनुजा वणकुद्रे, उदय कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
.............................