पाटील म्हणाले, जाधव यांचा 'कौल' हा पहिला कथासंग्रह आहे. त्यामध्ये १४ कथांचा समावेश आहे. मोह, घाट, पैज, देवाचा न्याय अशा सामाजिक आशय व संवेदनाना स्पर्श करणाऱ्या कथा वाचकांच्या मनावर नक्कीच कोरल्या जातील.
जाधव म्हणाले, विद्यार्थीदशेपासून लेखन करत होतो. वर्तमानपत्रातील वाचकांच्या पत्रव्यवहारांतून मला लेखनाची आवड निर्माण झाली. ज्येष्ठ साहित्यिक स्वामीकार रणजित देसाई यांची साहित्यमाला माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.
याप्रसंगी उपप्राचार्य एस. टी. कदम, रामा व्हन्याळकर, ए. टी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पर्यवेक्षक एन. एम. मनगुतकर, एस. एम. माने, डी. आर. धर्माधिकारी, व्ही. बी. व्हन्याळकर, पुंडलिक दरेकर, भीमा तरवाळ, एम. जी. पाटील, राजू पाटील आदी उपस्थित होते.
महेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एस. पी. पाटील यांनी आभार मानले.
---------------------
फोटो ओळी : कोवाड (ता. चंदगड) येथे 'कौल' या कथासंग्रहाचे प्रकाशनप्रसंगी एस. एन. पाटील, जयवंत जाधव, एस. टी. कदम, रामा व्हन्याळकर, ए. टी. पाटील आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०५०७२०२१-गड-०३