कोल्हापूर : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ आणि येथील निसर्गमित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधुकर बाचुळकर यांच्या "वृक्षरोपवाटीका, वृक्षारोपण, आणि वृक्षसंवर्धन" या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.या पुस्तकाचे प्रकाशन निसर्ग मित्र संस्थेचे संस्थापक सुरेश शिपूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. वृक्षसंपदा टिकवून ठेवण्याकरिता या पुस्तकाची सर्वांना मोठी मदत होईल असे मत शिपूरकर यांनी यावेळी व्यक्त केले. हे पुस्तक निसर्गप्रेमी नागरिकांना संस्थेच्या वतीने देणगी शुल्कामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी दिली.येथील निसर्गमित्र संस्थेमार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकामध्ये वृक्षसंपदा, वृक्षरोपवाटीका, विविध रोपांची तयार करण्याची पद्धत, वृक्षारोपण आणि लागवड करण्याच्या पद्धती, वृक्षसंवर्धन, वृक्षांविषयी गैरसमज या संबंधित अनेक विषयांवर शास्त्रीय माहिती मांडण्यात आली आहे, अशी माहिती लेखक डॉ. बाचूळकर यांनी दिली.आंतरराष्ट्रीय वनस्पती व पालेभाज्या संवर्धन वर्ष निमित्ताने गेल्या आठवड्यातच संस्थेच्या वतीने "प्रश्न तुमचे उत्तर आमचे" या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला नाशिक, पुणे, आणि कोल्हापूर शहर परिसरातून अनेक निसर्गप्रेमींचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांचे शास्त्रीय पद्धतीने समाधानकारक उत्तरे दिली.
मधुकर बाचुळकर यांच्या वृक्षरोपवाटिका पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 1:56 PM
environment Kolhapur : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ आणि येथील निसर्गमित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधुकर बाचुळकर यांच्या "वृक्षरोपवाटीका, वृक्षारोपण, आणि वृक्षसंवर्धन" या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
ठळक मुद्देमधुकर बाचुळकर यांच्या वृक्षरोपवाटिका पुस्तकाचे प्रकाशननिसर्गमित्र संस्थेचा पुढाकार : पर्यावरण दिनानिमित्त शास्त्रीय माहितीची मांडणी