जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला तसतसे तेल आणि डाळींचे भाव वाढू लागले आहेत. सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट या दरवाढीमुळे कोलमडले आहे. संचारबंदीच्या काळात अनेकांच्या हाताला काम नाही. त्यात रोजच्या जगण्यासाठी दोन वेळचे अन्न घरी शिजवावे लागते. त्याकरिता तेल, डाळी यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, हे दोन्ही आता दिवसेंदिवस आवाक्याबाहेर होऊ लागले आहे. मुळात डाळींची बाजारात मागणी असूनही आवक नाही, तर नव्या तेलबिया बाजारात आल्या नाहीत. विशेष म्हणजे सूर्यफूल, सोयाबीन हे इंडोनेशिया, मलेशिया, आदी देशांतून मोठ्या प्रमाणात आयात केले जाते. मात्र, या देशातून मागणीप्रमाणे पुरवठाही होत नाही. त्याचा एकत्रित परिणाम म्हणून तेलाचे दर भडकले आहेत.
कडधान्ये किलोचे दर असे, (कंसातील मागील महिन्यातील दर)
मूग - १२० रु. (९८-१००) , मसूर - ८० ते २६० (८० ते २४०), हरभरा- ६८ (८५) , मटकी - १४० (१२०), चवळी - १०० (८०), काळा वाटाणा - ८० (७२) , हिरवा वाटाणा - १८०(१६०)
डाळीचे किलोचे दर असे,
मूगडाळ - १७० (१२०), मसूरडाळ - ८०, हरभरा डाळ - ९० (८०), तूरडाळ -१२० (११०),
तेलाचे किलोचे दर असे,
शेंगतेल- १९०(१८०), सूर्यफूल -१९० (१८०-१८४), सरकी - १९० ( १४५-१५०), सोयाबीन - १६० (१४०-१५०)
कोट
तेलबिया व डाळींचे नवे उत्पादन बाजारात कमी प्रमाणात येऊ लागले आहे. त्यामुळे जागेवरच भाव वाढले असून, आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम रोजच्या बाजारभावावर होऊ लागला आहे.
-रवींद्र महाजन, व्यापारी