शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

‘पल्स’च्या गुंतवणूकदारांचे धरणे आंदोलन

By admin | Published: May 15, 2017 4:39 PM

कंपनीच्या मालमत्ता राज्य शासनाने ताब्यात घ्यावेत : गुंतवणूकदारांची मागणी

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १५ : पल्स कंपनीतील रक्कम गुंतवणूकदारांनी आपल्या ठेवी परत मिळाव्यात या मागणीसाठी सोमवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ अविनाश सुभेदार यांना निवेदन देताना चर्चेत, पल्स कंपनीच्या मालमत्ता महाराष्ट्र शासनाने ताब्यात घ्याव्यात व त्याच्याविक्री करुन त्यातून गुंतवणूकदारांचे पैसे भागवावेत अशी मागणी केली.पल्स कंपनीने (पीएसीएल) या कंपनीने देशभरातील सुमारे सहा कोटी लोकांकडून एकोणपन्नास हजार एकशे कोटी इतकी रक्कम जमा करुन मुदतीनंतरही त्या परत दिलेल्या नाहीत. सीबीआयने पल्स कंपनीच्या संचालकांना पकडून त्यांना तुरुंगात डांबले, त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या. अशा २८ हजार मालमत्ता सेबीच्या ताब्यात न्यायालयाने दिलेल्या आहेत, या मालमत्तांची विक्री करुन गुंतवणूकदारांच्या रकमा देण्याचे आश्वासन सेबीने दिले होते. पण त्या कामाला गती नाही. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.अशा फसवणुक करणाऱ्या कंपन्यांना आळा बसावा, त्यांना राजकारण्यांनी पाठींबा देऊ नये अशीही मागणी करण्यात आली. यावेळी शिष्ठमंडळात, सतिशचंद्र कांबळे, बी. एल. बरगे, महेश लोहार, रमेश वडणगेकर, इजाज जामदार, कृष्णात बिरंजे, राजकुमार नायकवडी, रविकिरण हरणे, बापू मोरे, नामदेव शिसेकर आदींचा सहभाग होता.आंदोलकांच्या मागण्या

 - पल्सकडून जप्त केलेल्या महाराष्ट्रातील मालमत्ता महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेऊन त्यांच्या विक्रीतून गुंतवणूकदारांचे पैसे भागवावेत.

-प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात सामान्य जनतेकडून बचतीचे किंवा जास्त परतीचे अमिष दाखवून रकमा जमा करणाऱ्या कंपन्यावर राज्य शासनाने नियंत्रण ठेवावे.

-अशा कंपन्यांची वस्तूस्थिती सामान्यपर्यत पोहचविण्याची जबाबदारी राज्य शासनाने उचलावी

- शासकिय पातळीवर बचतीसाठी योग्य पर्याय निवडावेत