शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पलूसमध्ये दोन गटांत धुमश्चक्री

By admin | Published: May 10, 2017 11:35 PM

दळवी-येसुगडे गट भिडले : जुन्या बसस्थानक चौकात तुफान दगडफेक; सहायक पोलीस निरीक्षक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कपलूस : पलूस शहरातील पाणीटंचाईबाबत सोमवारी झालेल्या सभेतील वाद बुधवारी पुन्हा उफाळून आला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खाशाबा दळवी व स्वाभिमानी रयत विकास आघाडीचे प्रमुख विठ्ठल ऊर्फ बापूसाहेब येसुगडे यांचे गट समोरासमोर भिडले. दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केल्याने जुन्या बसस्थानक चौकात वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांना पांगविल्याने अनर्थ टळला. दगडफेकीत सहायक पोलीस निरीक्षक अनिल शिंदे जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटांतील ३४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पलूस नगरपालिकेची निवडणूक नुकतीच झाली. चौरंगी लढतीत काँग्रेस व स्वाभिमानी रयत विकास आघाडीमध्ये चुरस होती. त्यात काँग्रेसने बाजी मारली. मात्र, निवडणुकीपासून खाशाबा दळवी व बापूसाहेब येसुगडे गटात संघर्ष सुरू आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर त्यात आणखी भर पडली. या संघर्षाचे पडसाद नगरपालिकेत वेळोवेळी दिसून येत आहेत.गेल्या दहा दिवसांपासून पलूस शहरासह तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी काँग्रेसचे नगराध्यक्ष राजाराम सदामते यांनी सोमवार, दि. ८ रोजी सभेचे आयोजन केले होते. सभेत सत्ताधारी मंडळींनी विरोधी स्वाभिमानी आघाडीलाच या पाणी टंचाईसाठी दोषी ठरवले. याला उत्तर देण्यासाठी विरोधी गटनेते दिलीप जाधव उभे राहिले असता, सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर जात त्यांना बोलण्यास अटकाव केला. यामुळे दळवी व येसुगडे गटातील संघर्ष विकोपाला गेला. बुधवारी सकाळी साडेसात वाजता येसुगडे यांना जाब विचारण्यासाठी काँग्रेसच्या दळवी गटाने युवक कार्यकर्त्यांना एकत्र केले. याची माहिती सुरुवातीला येसुगडे गटाला नव्हती. याची कुणकुण लागताच सकाळी ११ वाजता स्वाभिमानी रयत विकास आघाडीचे कार्यकर्तेही रागातच पलूसच्या मुख्य चौकात दाखल झाले. याची माहिती मिळताच काही ज्येष्ठ नेत्यांनी हा संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटी दोन्ही गट जुन्या बसस्थानक चौकात समोरासमोर आले. कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. काहींनी काठ्या व इतर हत्यारेही आणली होती. घटनेची माहिती मिळताच पलूस पोलिसांचे पथक घटनास्थळी धावले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावल्याने मोठा अनर्थ टळला. अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे हेही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दगडफेकीत सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या उजव्या हाताला दगड लागून दुखापत झाली. पोलिसांसह काही कार्यकर्तेही किरकोळ जखमी झाले. दरम्यान, या घटनेबाबत सहायक पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी फिर्याद दिली.पोलिसांचा वेळीच हस्तक्षेपअप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिंदे व भिलवडीचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील हरुगडे, कुंडलच्या सहायक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील व सहायक निरीक्षक धनाजी पिसाळ यांनी तासगाव, कुंडल, भिलवडी येथून जादा पोलिस कुमक मागवून परिस्थिती आटोक्यात आणली.