कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीतील जे रस्ते अतिवृष्टी व महापुरामुळे खराब झाले आहेत, त्यांचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंता व त्यांचे अभियंता आपल्या नेहमीच्या कामातून वेळ काढून पंचनामे करत आहेत.दरम्यान, दायित्व कालावधीत रस्ते खराब झाले असल्याचे आढळून आल्यास संबंधित ठेकेदाराकडून दुरुस्त करुन घेतले जातील, असे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.यंदाच्या अतिवृष्टी व महापुरामुळे शहराच्या अनेक भागांतील जवळपास १०७ किलोमीटरचे रस्ते खराब झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो. महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांमार्फत सर्वच रस्त्यांचे पंचनामे केले जात आहेत. खराब झालेल्या रस्त्यांमध्ये जर तीन वर्षांच्या गॅरंटी कालावधीतील असतील तर असे सर्व रस्ते संबंधित ठेकेदाराकडून दुरुस्त करून घेण्यात येणार आहेत.तीन वर्षांच्या आतच जर रस्ते खराब झाले असतील तर त्या ठेकेदारास नोटीस दिली जाईल. त्याच्याकडून रस्ते करण्यास टाळाटाळ झाली तर मात्र थेट फौजजदारी कारवाई करण्यात येईल, असे शहर अभियंता सरनोबत यांनी सांगितले.जानेवारीपासून शहरात अमृत योजनेमधील जलवाहिनी तसेच ड्रेनेजलाईन टाकण्याची कामे सुरू आहेत तसेच काही भागांत भूमिगत गॅस वाहिनी टाकण्यात येत आहेत. ३९ कोटींच्या केल्या जाणाऱ्या रस्त्यांची कामे थांबविली आहेत. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात फारसे रस्ते करता आलेले नाहीत. पावसाची उघडीप मिळताच रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू होतील, असेही सरनोबत यांनी सांगितले.
कोल्हापुरातील रस्त्यांचे पंचनामे सुरु, रस्ते ठेकेदारांकडून करून घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2021 8:09 PM
Flood Kolhapur Muncipalty : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील जे रस्ते अतिवृष्टी व महापुरामुळे खराब झाले आहेत, त्यांचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंता व त्यांचे अभियंता आपल्या नेहमीच्या कामातून वेळ काढून पंचनामे करत आहेत.
ठळक मुद्देकोल्हापुरातील रस्त्यांचे पंचनामे सुरु दायित्व कालावधीतील रस्ते ठेकेदारांकडून करून घेणार