शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

corona virus -एकाच्या घशातील स्राव तपासणीसाठी पुण्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 5:22 PM

नागाळा पार्क येथील एकाच्या घशातील स्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला आहे. कोल्हापूर विमानतळावर संबंधित व्यक्ती गेली असता परदेशी पर्यटकांना त्यांनी पाहिले. परंतु त्यांना ताप आल्याने शंका नको म्हणून ही व्यक्ती तपासणीसाठी येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील विशेष कक्षामध्ये आली होती.

ठळक मुद्देएकाच्या घशातील स्राव तपासणीसाठी पुण्यालासलग दुसऱ्या दिवशीही परदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणी

कोल्हापूर : नागाळा पार्क येथील एकाच्या घशातील स्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला आहे. कोल्हापूर विमानतळावर संबंधित व्यक्ती गेली असता परदेशी पर्यटकांना त्यांनी पाहिले. परंतु त्यांना ताप आल्याने शंका नको म्हणून ही व्यक्ती तपासणीसाठी येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील विशेष कक्षामध्ये आली होती.या विशेष कक्षामध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये १९ जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये इचलकरंजीच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. दुबई, इराण, जर्मनी, इटली या देशांमध्ये पर्यटनासाठी गेलेल्यांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या आठवड्याभरापासून कोल्हापूरमध्ये कोरोनाबाबत जागृती होत आहे. अशातच चार दिवसांपूर्वी विदेशी गेलेले स्थानिक परतले असल्याने मात्र काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही कोरोनाची माहिती न लपविण्याचे आवाहन केले असून, याचे गांभीर्य ओळखून परदेशी जाऊन आलेले नागरिकही सीपीआरमध्ये स्वत:हून तपासणीसाठी येत आहेत. चारच दिवसांपूर्वी दुबईसह अन्य देशांमधून काही नागरिक कोल्हापुरात दाखल झाले आहेत.

त्यातील मंगळवारी आठ, तर बुधवारी ११ जणांची तपासणी करण्यात आली. यातील मंगळवारी एकाला, तर बुधवारी एकाला ताप आणि खोकला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या दोघांचेही घशाचे स्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत.परदेशी पर्यटकांना पाहिल्याने सीपीआरमध्ये धावरोज कोरोनाबाबतच्या बातम्यांनी घाबरलेल्या नागाळा पार्कमधील एका व्यक्तीने कोल्हापूरच्या विमानतळावर केवळ परदेशी पर्यटकांना पाहिले म्हणून सीपीआरकडे धाव घेतली. आपण कोणत्याही परदेशी व्यक्तींच्या संपर्कामध्ये आलो नाही. मात्र, त्यांना मी जवळून पाहिले. आता मला ताप आणि खोकला आला आहे. तेव्हा तपासणी करा, असे या व्यक्तीने सांगितले. याच पद्धतीने इतरांनीही जागरूकता दाखविणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.मुंबईतील पुरस्कार वितरणासाठी वैद्यकीय प्रमाणपत्रआज, गुरुवारी मुंबई येथे यशवंत पंचायत राज स्पर्धेच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे आजी-माजी पदाधिकारी, अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, बुधवारी दुपारी मंत्रालयातून आलेल्या सूचनेनुसार या सर्वांना सोबत वैद्यकीय प्रमाणपत्र आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांची धावपळ उडाली. आजी-माजी अध्यक्षांसह पदाधिकारी आणि अधिकारीही वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र घेऊनच मुंबईला रवाना झाले आहेत. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची तब्ब्येत बरी नसल्याने मुंबईला जाणे रद्द केले.सकाळ, संध्याकाळी पुण्याची ड्युटीसंशयितांच्या घशातील स्राव घेतल्यानंतर ते २४ तासांत पुण्यामध्ये तपासणीसाठी पाठविणे आवश्यक असल्याने सीपीआरच्यावतीने दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. सकाळी एक आणि सायंकाळी एक पथक हा घशातील स्राव घेऊन पुण्याला जात असल्याचे सांगण्यात आले.रंगपंचमीवेळी दक्षता आवश्यकनागरिकांनी रंगपंचमी खेळताना एकत्र जमून गर्दी न करण्याचे आवाहन जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे. शक्यतो घराबाहेर पडू नये. तसेच दहावी, बारावीची परीक्षा सुरू असल्याने गोंगाट करून शांततेचा भंग करू नये. मोटारसायकलच्या पुंगळ्या काढून मोटारसायकली फिरवू नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोनाkolhapurकोल्हापूर