अत्यावश्यक सेवेतील दुकानांची तपासणी करण्याच्या सूचना प्रांत डाॅ. विकास खरात, मुख्याधिकारी टीना गवळी यांनी कर्मचाऱ्यांना दिले होते.
प्रांत खरात यांनी स्वतः कारवाई केली होती.
या पार्श्वभूमीवर आज अत्यावश्यक सेवेतील नो मास्क नो एन्ट्रीचे फलक दर्शनी भागात न लावणाऱ्या तसेच व्यावसायिकांचे कोरोना निगेटिव्ह किंवा लसीकरण नसणाऱ्या १२ व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये स्वप्निल पोवार, भक्ते मिरची केंद्र, केक अँड जॉय, हिरवे स्वीट मार्ट, बुढ्ढे अँड सन्स, दिघे अँड सन्स, कोकण शॉपी, होनोले किराणा दुकान, साई केक, पोपट लोले, गणेश ट्रेडर्स, मोरे अँड सन्स आदींचा समावेश आहे.
दरम्यान, आजपर्यंत ७० रुग्ण झाले आहेत. यातील ३१ रुग्ण बरे झालेले आहेत. तर ३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील वाढती रुग्णसंख्या शहराची काळजी वाढवणारी आहे.