येथील उपनगराध्यक्ष निवडीनंतर समर्थकांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करत जल्लोष केल्याप्रकरणी दहा जणांवर मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दंडात्मक कारवाई करत पालिका लोकप्रतिनिधींनाही कारवाईचा झटका दिला आहे.
लाॅकडाऊनमुळे शुक्रवारी उपनगराध्यक्ष निवड मुख्याधिकारी जाधव यांनी पालिकेची ऑनलाईन सभा घेतली. मात्र, निवडीनंतर नूतन उपनगराध्यक्ष डॉ. सुनील चव्हाण समर्थकांनी जल्लोष रॅली काढली होती. मुख्याधिकारी जाधव कोरोना नियमांच्या उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईबाबत पक्षपातीपणा करत असल्याची टीका शहरवासीयांतून होत होती. त्यामुळे उपनगराध्यक्ष निवडीनंतर समर्थकांनी लाॅकडाऊन नियम मोडून जल्लोष केल्याने मुख्याधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, जल्लोष करणार्या समर्थकांचे फोटो पाहून एकून दहा जणांवर दंडात्मक कारवाई करत लोकप्रतिनिधीनाही कारवाईचा झटका दिला आहे.